top of page

हायवेवरील गुजराती पाट्यांविरोधात मनसे आक्रमक

Updated: Jul 27

हॉटेलधारकांना मराठी पाट्या लावण्याचा अल्टीमेटम


ree

मुंबई–अहमदाबाद महामार्गालगत अच्छाड ते घोडबंदर दरम्यान असलेल्या हॉटेलांवरील गुजराती भाषेतील नामफलकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.


या पार्श्वभूमीवर तलासरीमध्ये मनसे पदाधिकारी आणि हॉटेल मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी पोलीस निरीक्षक अजय गोराड यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी हॉटेल मालकांना स्पष्ट सूचना दिल्या की, हॉटेलवरील नामफलक आणि मेनू कार्ड्स मराठीत असणे आवश्यक आहे. येत्या सात दिवसांत मराठी पाट्या न लावल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.


हॉटेल मालकांनी मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, सात दिवसांत मराठी पाट्या आणि मेनू कार्ड्स लावण्याचे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक अजय गोराड यांनी देखील हॉटेलधारकांना कायद्यानुसार महाराष्ट्रात व्यावसायिक पाट्या मराठीत असणे बंधनकारक असल्याचे समजावले आणि पुढील वाद टाळण्याचे आवाहन केले.


या बैठकीस मनसेचे तलासरी तालुकाध्यक्ष विजय वाढीया, रस्ता आस्थापना उपसंघटक डहाणू नंदू कोदे, तालुका सचिव नितेश भेलका, उपतालुकाध्यक्ष जयेश म्हसे, विभाग अध्यक्ष कृष्णा फेसरडा, जितू भोईर, शाखाध्यक्ष जगदीश गोवारी, उपशाखाध्यक्ष नन्हू हाडळ, शैलेश म्हसे यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page