हेरगिरी करणार्या ज्योतीचे ‘पंख छाटले’! मोठी कारवाई; सोशल मिडियाचे अकाऊंट सस्पेंड
- Navnath Yewale
- May 19
- 2 min read

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप झेलणार्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर मोठी कावरवाई करण्यात आली आहे. तिंच इन्स्टाग्राम आकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असून, लवकरच तिचं युुट्यूब चॅनल देखील बंद होण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावर लाखो फॉलोअर्स असलेली ही प्रभावशाली व्यक्ती काही काळ भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होती. आता तिच्या डिजिटल साम्राज्यांवर गडांतर आल्याने एकप्रकारे तिचे पंख छाटण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
हरियाणातील ही ग्लॅमरस युट्यूबर इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलीग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी गप्तचर एजंट्सच्या थेट संपर्कात होती. असा आरोप आहे. तिने तिच्या फोनमध्ये पाक एजंट्सचे नंबर वेगवेळ्या नावाने सेव्ह करून त्यांच्याशी सतत संवाद साधत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
देशाशी गद्दारी :
‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने युट्यूबवर सक्रिय असलेल्या ज्योती मल्होत्राचं चॅनल हे ट्रॅव्हल व्लॉगिंगसाठी प्रसिद्ध होतं. तिच्याकडे युट्यूबर 3.77 लाख सबस्का्रयबर्स आणि इन्स्टाग्रामवर 1.32 लाख फॉलोअर्स होते. तिचा एक ग्लॅमरस सोशल मिडिया इमेज होती. मात्र, या ग्लॅमरच्या आडून ती पाकिस्तानी एजंटांसाठी भारतात एक ‘संपर्क’ म्हणून काम करत होती. असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
तिने 2023 मध्ये एजंटांच्या मदतीने व्हिसा मिळवून पाकिस्तानला दौरा केला होता. तिथे ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एहसान-उर-उर्फ दानिश या अधिकार्याच्या संपर्कात आली. या अधिकार्याला नुकताच भारतातून हद्दपार करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पहलगाम हल्यानंतर चार दिवसांच्या लष्करी सघर्षादरम्यानही ज्योती आणि दानिश यांच्यात संपर्क होता.
पोलिस म्हणतात, ‘हे देखील युद्धच आहे’
हिसारचे एसपी शशांक कुमार यांनी या प्रकरणी मोठं विधान करत सांगितलं की, “ हे देखील युद्धाचाच एक भाग आहे. पाकिस्तानी एजन्सीज प्रभावशाली सोशल मिडिया युझर्सना आपल्या नेटवर्कमध्ये ओढत आहेत. ज्योती मल्होत्रा ही अशाच प्रकारे तयार करण्यात आलेली संपर्क होती. “ तिच्याकडे थेट लष्करी माहिती नसली तरी ती अशा इन्फ्लुएन्सर्सच्या नेटवर्कमध्ये होती, जे खुद्द पाकिस्तानी एजंट्सशी संबंधीत होते.
या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट म्हणजे. ज्योती मल्होत्राला तयार करण्यामागे ज्या लोकांचा हात होता, त्यांच्यावरच सध्या गाजणार्या कारवाया सुरू आहेत. त्यामुळे ज्योती ज्यांच्यावर उडायची, तेच पंख आता छाटले गेल्याची चर्चा आहे. तिंच सोशल मिडिया प्रभाव आणि ग्लॅमर यंत्रणांनी एकप्रकारे नष्ट करण्याची तयारी चालू केली आहे.
Comments