top of page

‘हे नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर ..., ’गुन्हेगारी स्टाइलने रिल्स बनवणार्‍या तरुणींला पोलिसांनी दाखवल्या खाक्या

ree

नाशिक: शहरात गेल्या 9 गेल्या महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांना आव्हान देणार्‍या पोस्ट, रीलसह गुन्हेगारी घटनांवर आधारित व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काळी दिवसांपूर्वी गुन्हेगारी स्टाइलमध्ये रील तयार करून प्रसिद्धी मिळवणार्‍या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती.त्यांनंतर आता दोन तरुणींनी तयार केलेला धमकीवजा रील सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरूणींना नाशिक पोलिसांना चांगला धडा शिकवला आहे.

नाशिकमधील दोन मरुणींनी सोशल मीडियावर धमकी देणारा एक रील तयार करून पोस्ट केली होती. ‘ हे नाशिक आहे भावा, जू येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटंल हॅस नाशिक असे या रीलमध्ये म्हटले आहे. या वक्तव्यानंतर रील झपाट्याने व्हारल झाला आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली. रीलमध्ये गुन्हेगारी आणि धमकीचा सूर पोलिसांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेतली.


नाशिक पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत या दोन्ही तरुणींना शोधून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी केली असून अशा प्रकार समाजात भीती निर्माण करणारे किंवा गुन्हेगारी वर्तनाचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी धडा शिकवण्यासाठी या मुलींचा एक व्हिडिओ तयार केला यामध्ये स्वत: त्या मुलींनी असे व्हिडीओ न करण्याचे आवाहन केले आहे. महिला असो की पुरूष कायद्याचे उल्लंघन केले तर फटके पडणारच, असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे.


नाशिक पोलिसांनी या प्रकरणी इशारा दिला आहे की, सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा रील्स तयार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, खाकी दाखवतात नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला आहे, उसे उद्गार पोलिसांनी काढत नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक नागरिकांकडून होत आहे.


Comments


bottom of page