top of page

हैदराबादेत आग्नीतांडव, 17 जणांचा वेदनादायक मृत्यू; आगीत प्रचंड नुकसान




हैदराबाद शहरात आज सकाळी चारमिनारजवळील गुलजार हाऊस परिसरातील एका बहूमजली इमारतीला अचानक आग लागल्याने एक दु:खद घटना घडली. या इमरातीत तळमजल्यावर दुकाने होती, तर वरच्या मजल्यावर लोक राहत होते. अपघात इतका भीषण होता की काही मिनिटांतच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले.

अपघात झाला तेव्हा बहुतेक लोक गाढ झोपेत होते आणि जेव्हा त्यांना काही समजले. तेव्हा खूप उशीर झाला होता. सर्वत्र धूर होता, ज्यामुळे गुदमरुन आणि जळून 17 जणांचा वेदनादायक मृत्यू झाला. ही घटना अलिकडच्या काळात हैदराबादमधील सर्वात मोठ्या आगीच्या घटनांपैकी एक बनली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे.


इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे 5:30 च्या सुमारास आग लागली, जिथे दुकाने सुरू होती. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण इमरात धुराने व्यापून गेली, ज्यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही. या अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना तातडीने डीआरडीओ रुग्णालय, उस्मानिया जनरल रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना वाचवणसाठी डॉक्टरांची टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, भरपाईची घोषणा

हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊस परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. सकाळी एका इमारतीत ही आग लागली. पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट केले . “ हैदराबादमधील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवीतहानीबद्दल मनापासून दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमींच्या लवकर पुनपर्प्राप्तीसाठी प्रर्थना.”


अग्निशमन विभागाकडे पुरेशी उपकरणे नव्हती

केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी म्हणाले की, “ आज चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमरातीत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 6 वाजता घडली. अशा घटना खूप दु:खद आहेत. येथील लोकांनी सांगितले की अग्निशमन विभागाकडे पूर्ण उपकरणे नव्हती. मी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांशी बोलेन आणि या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मतद देण्याचा प्रयत्न करेन.

Comentarios


bottom of page