35 वर्षापूर्वी जागा देऊन चूक केली का?
- Navnath Yewale
- Apr 8
- 3 min read

दिनानाथ रुग्नालयामध्ये पैंशाअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली. त्यानंतर या रुग्नालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील खिलारे कुटुंबीयांबद्दल सोशल मिडियामध्ये एक पोस्ट फिरत आहे. भाउसाहेब खिलारेंनी शरद पवारांच्या सांगण्यावरुन लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन दिली होती. या सगळ्या घटनेवर आता खिलारे कुटुंबातील वारस चित्रसेन खिलारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी या रुग्णालयाबद्दल खिलारे कुटुंबीयांना आलेले अनेक चांगले - वाईट अनुभव सांगितले.
चित्रसेन खिलारे म्हणाले की, बाळासाहेब खिलारे यांच्या डेक्कन परिसरात मोठ्या जमीनी होत्या. सामाजीक संस्थासांठी त्या मोठ्या प्रमाणात दान करण्यात अल्या होत्या. 1989 साली लता मंगेशकरांनी रुग्णालयासाठी जमीन मागितली. लता मंगेशकरांनी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंर शरद पवारांनी भाऊसाहेबांना जागेसाठी विचारलं. तुमुच्या अनेक जागा या सामाजिक कार्यासाठी वापरल्या गेल्या आहेत, आता गरिबांसाठी एक रुग्णालय उभा राहत असेल तर ती चांगली गोष्ट आहे असं पवारांनी सांगितलं.
त्यावेळी सर्व सरकारी रुग्णालये पुण्यातील पूर्व भागात होती. पश्चिम भागात एकही मोठं रुग्णालय नव्हतं. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी जर रुग्णालय उभं राहत असेल आणि ते आपल्या जागेवर राहत असेल तर ती पुण्याईची गोष्ट आहे, असं भाऊसाहेबांना वाटलं अणि त्यांनी जमीन दान करायची ठरवली. त्यानंतर शरद पवारांनी सरकारी स्तरावर तात्काळ हालचाली केल्या आणि ती जागा लता मंगेशकरांच्या दिनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली.
रुग्णालयाच्या उद्धटनावेळी भाऊसाहेबांना मागे बसवलं
ज्या वेळी रुग्णालयाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम ठरला त्यावेळी आम्हाला निमंत्रण पत्रिका आली होती. त्या कार्यक्रमाला गेलो असता भाऊसाहेबांना मागे कुठेतरी, चौंदाव्या-पंधराव्या रांगेत बसवण्या आलं होत. भाऊसाहेबांना पाहताच एक महिला पोलिस अधिकारी धावत आल्या आणि त्यांनी खंत व्यक्त केली. ज्यांनी रुग्णालयासाठी जागा दिली त्यांनाच पुढे बसायला जागा नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतरही भाऊसाहेबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कारण एका हाताचं दान देतो ते दुसर्या हाताला कळू नये अशी त्यांची भावना होती.
खिलारे कुटुंबीयांनी साडेतीन लाखाचे बील भरले
2010 साली भाऊसाहेब खिलारे यांच्यावर दिनानाथमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. त्यावेळी साडे तीन लाखांचे बील झाले होते. ते बील आम्ही रितसर भरले. भाऊसाहेब हे रुग्णालयात आहेत असं डॉ. रणजीत जगताप यांना समजले त्यावेळी ते आम्हाला भेटायला आले. त्यांनी थेट भाऊसाहेब खिलारे यांचे पाय धरले. या रुग्णालयासाठी जागा देणार्या मूळ मालकाचे ऑपरेशन माझ्या हस्ते झाले, ही पुण्याई मला लाभली. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी इथे आलो असल्याचं रणजीत जगताप म्हणाले. डॉ. केळकर हे व्हिजिटिंगला आले असता त्यांनी त्याची फी लावली असल्याचा किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल आपल्याला इतकी माहिती नसून बिलाचे जुने रेकॉर्ड काढून ते तपासावेत.
भाऊसाहेबांच्या मृतदेहासाठी जागा देण्यास नकार
भाऊसाहेबांची अचानक तब्येत बिगाडली त्यावेळी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत भाऊसाहेबांचे निधन झालं होतं. हा धक्का आपल्या आईला सहन होणार नाही. त्यामुळे भाऊसाहेबांची बॉडी ही रात्री रुग्णालयातच ठेऊयात आणि सकाळी घेऊन जाऊयात असं आमचं ठरलं. पण दिनानाथच्या अधिकार्यांनी सांगितलं की रुग्णालयात जागा नाही. हे ऐकून स्थानिकांना मोठा धक्का बसला. ज्या मूळ मालकांनी रुग्णालयासाठी ही जमीन दिली त्यानांच जागा नसल्याचं कारण सांगून नाकारलं जात आहे, यावर आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनातील एका मित्राला फोन करुन सांगितल्यानंतर वरुन हालचाल झाली. नंतर भाऊसाहेबांची बॉडी ठेवण्यासाठी जागा देण्यात आली.
35 वर्षानंतर वाटतेय, आम्ही चूक केली का ?
एखाद्या रुग्णाला पैंशामुळे दाखल करुन घेतलं जात नाही आणि तो रुग्ण दगावतोय. 35 वर्षानंतर आता असं वाटतंय की आम्ही चूक केली का? त्या ठिकाणी आमची शेती होती. आम्ही स्वत:चा ट्रस्ट न काढता ती जमीन मंगेशकरांना दान केली. प्रत्येक रुग्णाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यामागे होती. पण आज पैंसा भरला नसल्याने रुग्ण दगावतोय. आपण सगळे इतके असंवेदनशील झालोय का?
तनिषा भिसेंचा दुर्दैंवी मृत्यू झाला. असंवेदनशील घटना घडली हे दूर्दैंव आहे. ज्या हेतूसाठी खिलारे कुटुंबीयांनी 35 वर्षापूर्वीजागा दिली तो हेतू साध्य होतोय का? असा आज प्रश्न पडतोय. या पुढच्या काळात तरी अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत. तनिषा भिसे यांना रुग्णालयात आल्यानंतर पहिल अॅडमिट करुण घेणं हे महत्वाचं होतं.
यापुढे कोण आपली जमिन देईल का?
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या महिलेला दहा लाख रुपये भरण्यास सांगितले. त्याशिवाय अॅडमिट करण्यात येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्या महिलेचा वेळीच उपचारा अभावी मृत्यू झाला. यापूढे अशा रुग्णालयांसाठी कुठलाही जमीनदार किंवा शेतकरी जागा देईल का? असा प्रश्न पडतो. या घटनेला आम्ही खिलारे कुटुंबीय जबाबदार आहोत, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. यापूढे अशा गोष्टी घडू नये यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे.
Opmerkingen