40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार - उपसभापती डॉ. गोर्हे
- Navnath Yewale
- May 17
- 1 min read

महिलांमध्ये आरोग्याचे विविध समस्या दिसून येत आहेत. लाडक्या बहिणींचे आरोग्य सदृढ करण्यासाठी आरोग्याचे कार्यक्रम राबवून 40 लाख महिलांपर्यंत, आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घ्यावा. अस शिवसेना महिला आघाडीला सुचलेलं आहे. शासकिय रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आदी माध्यमातून शिवसेना महिला आघाडीच्या वतिने आरेाग्य शिबीरे घेण्यात येणार आहेत. अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी नांदेड यथे पत्रक़ार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंडारकर यांच्यासह शिवसेनेच पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. गोर्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, जुन-जुलै महिण्यामध्ये विविध शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले लागतात. हे दाखले सोप्या पद्धतीने मिळावे, यासाठी समाधान शिबीरे घेवून तातडीने कागदपत्र दिले जाणार आहेत. यासाठी महसूल प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. निलम गोर्हे यांनी केले.
Comments