top of page

50 हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण; अपहरणकर्त्याच्या आईची पोलिसात धाव


गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे राज्याच्या पटलावर चेर्चेत आहे. दरम्यान, आता आणखी एक घटना समोर आली आहे. 50 हजार रुपयांसाठी एका मुलाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरुणांनी एका तरुणाचे अपहरण केलं. तरुणाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता 50 हजार रुपये टाका अन्यथा मुलागा तुम्हाला परत दिसणार नाही अशी धमकी दिली. ही घटना उघडकीस आल्यानंर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईमध्ये दोघांना अटक केली आहे.


प्राप्त माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात केवळ 10 हजार रुपयांच्य उसनवारीवरुन तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या आईला फोन करून धमकी दिल्याचे समोर आले. “ मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार रुपये पाठवा , नाहीतर तो कधी दिसणार नाही ” अशी धमकी आरोपींनी दिली.


ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राख आणि परमेश्वर आघाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपये व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम 80 हजारांवर गेली. पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले.


अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर मुलाला सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी कृष्णाच्या आईला दिल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणी धारुर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी धारूर पोलिसांनी आंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Comentarios


bottom of page