76 शेकंदाच्या ट्रीझरमध्ये 18 कलाकारांची झलक...
- Navnath Yewale
- Apr 30
- 1 min read

अक्षय कुमारच्या ‘हाऊसफूल 5’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक बर्याच दिवसांपासून वाट पाहत होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही खूप अपेक्षा आहेत. लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी आज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘हाऊसफूल 5’ चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी रिलीज झाला आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक बॉलिउूड स्टार एकत्र दिसत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदिर्शित होताच सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे.
टीझरमध्ये 18 कलाकार दिसले एकत्र
अक्षय कुमारसोबत या चितपटात अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे एकून 18 स्टार आहेत. या सर्व कलाकारांची झलक टीझरमध्ये पाहता येते काही सेकंदांच्या एका झलकाने लोकांना हसायला भाग पाडले.
76 सेकंदाच्या टीझरने उडवला गोंधळ
76 सेकंदाच्या या टीझरने लोकांची मने जिंकली आहेत. लोकांना हा टीझर खूप आवडला आहे. 76 सेकंदाच्या टीझरमध्ये 18 कलाकारांची झलक दिसते. टीझरच्या सुरुवातील एक मोठे जहाज दिसते, जे समुद्रात आहे आणि लोक ज्यावर मजा करताना दिसत आहेत. सर्वकलाकार आपापल्या भूमिकेत आहेत. आणि या सगळ्यामध्ये, एक खुनी आहे, ज्याने आपला चेहरा मुखवट्याने लपवला आहे.
‘ हाऊसफूल 5’ ची रिलीज डेट
टीझर पाल्यिानंतर लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपाटच्या प्रदर्शनाची तरीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
प्राप्त माहितनूसार ‘हाऊसफूल ’ हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि दोन वर्षानी ‘ हाऊसफूल2’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक साजिद खान होते. यानंतर 2016 मध्ये ‘हाऊसफूल 3’ प्रदर्शित झाला. नंतर 2019 मध्ये
‘हाऊसफूल 4’ प्रदर्शित झाला.
‘हाऊसफूल’ चित्रपटाच्या सर्व मालिका साजिद नाडियादवाला यांनी तयार केल्या आहेत. या फँ्रचायझीच्या प्रत्येक चितपटात एक नवीन कथा पहायला मिळाली आहे.
Comments