ओबीसी एल्गार मेळाव्याकडे ओबीसींच्या या नेत्यांनी फिरवली पाठ
- Navnath Yewale
- Oct 17
- 1 min read

बीड: अखिल भारतीय महात्म फुले समता परिषदेच्या वतिने बीडमध्ये आयोजीत ओबीसी एल्गर मेळाव्याकडे दिग्गज ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवल्याने ओबीसींमधील फूट चव्हाट्यावर आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुखउपस्थितीत बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, नागपूर येथे ओबीसींचा मोर्चा काढणारे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एल्गार सभेकडे पाठ फिरवली.
बीडच्या एल्गार सभेतून ओबीसींच्या नेत्यांमधील विसंगती समोर आली आहे. दरम्यान, एल्गार सभेसाठी सभास्थळी लावलेल्या प्लेक्सवर मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याचे दिसून आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी आपनास एल्गार सभेचे आमंत्रण नसल्याचे सांगत 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसींवर कसलाच अन्याय होत नाही, जीआरमध्ये 2012 च्या कायद्यानुसारच नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्यात येतील असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळणे हा त्यांचा हक्क आहे, आणि त्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. हे संविधान सांगतय. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जीआरमध्ये कुठेही नमुद नाही त्यामुळे गैरसमज पसरवून समाज अशांत करू नये असा इशराही त्यांनी ओबीसी नेत्यांना दिला.



Comments