top of page

रितनंद बलदेव एज्युकेशन फाऊंडेशन शैक्षणिक संस्थेला 15 एक्कर जमिन मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (19 मे) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


अ‍ॅमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील पंधरा एकर जमीन देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात मान्यता देण्यात आली.

रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या अ‍ॅमिटी विद्यापीठांतर्गत 18 शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात. याठिकाणी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विस्तारासाठी संस्थेने जमिनीची मागणी केली आहे.


त्यानुसार रायगड जिल्ह्यातील भताण (ता. पनवेल) येथील सर्वे नंबर (8/0,9/2,10/3,13/5,14/0,167/1,178/0,182/4)या आकारीपड जमिनीपैकी सुमारे 15 एक्कर जमिन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमिन कब्जेहक्काची रक्कम भरून घेऊन वर्ग -2 या धारणाधिकाराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतीगृहे,ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठी केला जाणार आहे.

Comments


bottom of page