top of page

सुनेनं आयुष्य संपवलं; शवविच्छेदन अहवालाने हगवणे कुटुंबाचा बुरखा टराटरा फाडला, पोलिसांची सहाव्या दिवशी मोठी कारवाई


ree

पुणे जिल्ह्यातील एका राजकीय पुढार्‍याच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यातील राजकाराणात एक महत्वाचं व्यक्तीमत्व असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच वैष्णवी हगवणे प्रकरणात नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्यूनर कार, अ‍ॅक्टिव्हा जप्त केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, हगवणे कुटुंबीयातील इतर सदस्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.


तसेच या प्रकरणात आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल देखील समोर आला आहे. वैष्णवीचा मृत्यू हा मानेभोवती फास लागल्याने झाला. तसेच तिच्या अंगावार धारदार वस्तूने वार केल्याच्या खूप सार्‍या खुणा देखील आढळून आल्या. असं बीजे हॉस्पीटलने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.


या प्रकरणात आतापर्यंत बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक आणि सासू, नणंदेला बेड्या ठोकल्या आहेत. तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे दिर अजूनही फरार आहेत. प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी देखील कारवाईची गती वाढवली आहे. शशांक हगवणे याला हुंड्यात मिळालेली आलिशान फॉर्च्यूनर कार, अ‍ॅक्टिव्हा बावधन पोलिसांनी आता जप्त केली आहे.


वैष्णची तिच्या कुटुंबीयांना कायमची सोडून निघून गेली आहे. तिच्या पाठीमागे तिचं दहा महिन्याचं चिमुकलं बाळ देखील आहे. आईविना ते बाळ पोरकं झालं असून निर्दयी हगवणे कुटुंबीयांनी तिच बाळ नेमकं कुठे आहे आणि त्याला कोण संभाळत आहे, याची साधी माहिती देखील वैष्णवीच्या माहेरच्यांना अद्याप दिलेली नाही

Comments


bottom of page