गाडीतील कोट्यावधी रुपयांची रोकड वाटून घेतली !
मध्य प्रदेशातल्या बंडोल अख्ख्या पोलिस स्टेशनलाच थेट घराचा रस्ता
नागपूर: नागपूरमार्गे जालन्याला निघालेल्या गाडीमधून जप्त केलेली तीन कोटी रुपयांची रक्कम आपआपसात वाटून घेतल्याप्रकरणी एसडीओपी, ठाणेदारासह 10 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गैरव्यवहार करणे, संशयास्पद वागणूक, कामात बेजबाबदारपणा आणि दिरंगाईबद्दल मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्याचया उपविभागीय पोलिस अधिकारी आणि बंडोल पोलिस ठाण्यातील 10 कर्मचार्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सिवनीच्या उपविभागिय पोलिस अधिकारी पूजा पांडे, बंडोल पालिस ठाण्याचे प्रभारी उपनिरिक्षक अर्पित भैरम, सिवनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील प्रधान आरक्षक माखन, रीडर रवींद्र उईके, आरक्षक जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, चालक रितेश, आरक्षक नीरज रातपूत, आरक्षक (गनमॅन) केदार, आरक्षक सदाफळ अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व पोलिसांची नावे आहेत. या कारवाईमुळे मध्य प्रदेश पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौेकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, 8 ऑक्टोबरला रात्री उशिरा नकाबंदीमध्ये पोलिस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी कटनीवरून नागपूर मार्गे जालन्याला निघालेल्या एका कारमध्ये तीन कोटी रुपये आढळून आले. ही रक्कम पोलिसांनी वाटून घेतली होती.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पांडे यांना माहिती देण्यात आली. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसर्या दिवशी नागपुरातील काही व्यक्तींनी तक्रार देण्यासाठी थेट सिवनी गाठले. त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकरण उजेडात आले.