रणजीत कासले यांच्या नव्या व्हिडीओनं खळबळ

रणजीत कासले यांच्या नव्या व्हिडीओनं खळबळ
Published By: Navnath Yewale
Published On:

बीड पोलिसांना कासलेंच चॅलेंज

बीडचा निलंबित पीएसआय रणजीत कासलेच्या व्हिडीएने खळबळ उडाली होती. सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा दावा कासलेने व्हिडीओत केला होता. त्यावेळी नेमकी सुपारी कुणी दिली होती? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, आता रणजीत कासलेचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. दुसर्‍या व्हिडीओतही कासलेने खळबळजनक दावा केला आहे. कासलेच्या नव्या व्हिडीओमध्ये नेमंक काय? रणजीत कासलेने व्हिडीओमध्ये कुणाचं नाव घेतलंय? बीड पोलिसांना कासलेने कुठलं चॅलेंज दिलं आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट निलंबीत पीएसआय रणजीत कासलेंनी केला होता. या गौप्यस्फोटानंतर आता कासलेंनी पुन्हा एक हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कासलेंनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी धनजंजय मुंडेंनीच दिल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच मला पकडून दाखवाच, असं ओपन चॅलेंज कासलेंनी बीड पोलिसांना केलं आहे.

बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी निलंबीत पोलिस रणजीत कासले यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये कासलेनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. वाल्मिक कराडच्या हत्येची सुपारी ळिाली असून एन्काऊंटरसाठी 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा सनसनाटी दावा कासलेने त्या व्हिडीओतून केला होता. रणजीत कासलेचा आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कासले यांनी वाल्मिक कराडच्याा एन्काऊंटरची सुपारी नक्की कोणी दिली? त्या व्यक्तीचं नावंच कासले यांनी घेतलं आहे.

रणजीत कासलेने थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच नाव घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडेना वाल्मिक कराड नको होते म्हणून त्यांनी एन्काऊंटरची सुपारी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट या व्हिडीओमधून कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. मुंडे बीडमध्ये नसताना त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांसोबत इतर गोष्टींवर कराडचं लक्ष होतं.

धनंजय मुंडे यांची सगळी अंडी-पिल्ली माहित आहेत म्हणून कराडला बाजूला करण्यासाठी एन्काऊंटर करायचा होता, असा खळबजनक दावा कासलेने व्हिडीओतून केला आहे. तसंच धनंजय मुंडेना गृहमंत्री फडणवीसांचा सपोर्ट असल्याचंही कासलेने या व्हिडीओत म्हटलं आहे. रणजीत कासलेचा पहिला व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कासलेने नव्या व्हिडीओतून पोलिसांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

Tags:

Related Posts