श्रद्धा कपुर बनली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री! शुल्क पाहून अभिनेत्यालाही बसेल धक्का

श्रद्धा कपुर बनली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री! शुल्क पाहून अभिनेत्यालाही बसेल धक्का
Published By: Navnath Yewale
Published On:

‘स्त्री2’ ची नायिका श्रद्धा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या फीसाठी चर्चेत आली आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर खूप कमवाई केली. त्यानंतर तिची लोकप्रियता वाढत आहे. प्रत्येकाला तिला चित्रपटात कास्ट करायचे आहे. याच कारणामुळे तिने तिची फीस वाढवली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर ही एकता कपूरच्या चित्रपटात काम करत आहे. यासाठी तिने 17 कोटी शुल्क आकारले आहे. एवढेच नाही तर तिने तिच्या करारात नफा वाटणीचा कलम देखील समाविष्ट केला आहे. याचा अर्थ असा की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जो काही नफा होईल, त्याचा काही भाग श्रद्धालाही मिळेल.

रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर जे मानधन घेत आहे. ते आतापर्यंत इतर कोणत्याही बॉलिवून अभिनेत्रीने घेतलेल्या मानधनापेक्षा जास्त आहे. एकता आणि श्रद्धाच्या चित्रपटाच्या नावाची माहिती अद्याप आलेली नाही. सध्या ते प्री-प्रॉडक्शन टप्यात आहे. जुलैनंतर हा चित्रपट फ्लोअरवर जाईल, असे वृत्त आहे. याआधी श्रद्धाने ‘स्त्री2’ साठी 5 कोटी रुपये घेतले होते.

श्रद्धाच्या एकून संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, तिची एकूण संपत्ती 130 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ती सुमारे 5 कोटी रुपये घेते. लाईफस्टाईल एशियाच्या अहवालानुसार, ती ब्रँड प्रमोशनसाठी सुमारे 1.6 कोटी रुपये घेते. ती वीत, लॅक्मे, लिप्टन, द बॉडी शॉप आणि वोग सारख्या अनेक आघाडीच्या ब्रँडना प्रोत्साहन देते.

तिच्या आलिशान गाड्यांमध्ये 83.3 लाख रुपये किमतीची ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ जीएलई आणि 1.50 कोटी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू 7 सिरीज यांचा समावेश आहे. याशिवाय कपूर जुहूमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांच्या मालमत्तेत राहतात. तर, त्यांचा दुसार बंगला मड आयलंडवर आहे. रिपोर्टनुसार, त्याची किंमत 20 कोटी रुपये आहे. कपूरने तिच्या फॅशन लेबल इमारासोबत व्यावसायातही पाऊल ठेवले आहे.

Tags:

Related Posts