दमदार सामन्यात केकेआर कडून राजस्थानचा एका धावेने पराभव...

दमदार सामन्यात केकेआर कडून राजस्थानचा एका धावेने पराभव...
Published By: Navnath Yewale
Published On:

केकेआरने त्यांच्या घरच्या स्टेडियम ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यात यश मिळवले. आंद्रे रसेलने शेवटच्या क्षणी अद्भूत फलंदाजी दाखवून केकेआरसाठी खळबळ उडवून दिली. त्याने नाबाद अर्धशतक ठोकून संघाची धावसंख्या 206 पर्यंत नेली. यामुळे राजस्थानचा एका धावेने परभव झाला.

नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, हे चुकीचे ठरले, कारण सलामीवीर सुनील नरेन 11 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर क्रिजवर आलेल्या अजिंक्य रहाणेने चांगली फलंदाजी केली. त्याने गुरबाजसोबत अर्धशतकी भागीदारी केली. चांगली फलंदाजी करताना, गुरबाज 25 चेंडूत 35 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्यांच्यानंतर रहाणेची बॅटही शांत झाली. तो 30 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. येथून अंगक्रिश रघुवंशी आणि आंद्रे रसेल यांनी मिळून पदभार स्वीकारला.

दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. 31 चेंडूंत 44 धावांची खेळी खेळल्यानंतर रघुवंशी बाद झाला. रसेल शेवटपर्यंत क्रिजवर राहिला आणि त्याने स्फोटक फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रसेलच्या बॅटने 25 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी साकारली केकेआरने 4 विकेटच्या मोबदल्यात 206 धावांचा मोठा डोंगर उभा केला.

प्रत्युतर डावात राजस्थान रॉयल्सचीसुरवात खराब झाली. वैभव सुर्यवंशी 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर खेळायला आलेला कुणाल सिंग राठोडही फलंदाजीत अपयशी ठरला. तो खाते न उघडताच बाद झाला. जयस्वालने काही आकर्षक फटके मारले आणि 21 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. जुरेल आणि हसरंगा दोघेही खाते न उघडता बाद झाले. राजस्थानने फक्त 71 धावांवर 5 विकेट गमावल्या.

Tags:

Related Posts