मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ ने गाठला एक महत्त्वपूर्ण टप्पा

मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ ने गाठला एक महत्त्वपूर्ण टप्पा
Published By: Navnath Yewale
Published On:

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे.

या अंतर्गत, भायंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील [ROB] अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. ही कामगिरी सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेच्या बंधनात उत्कृष्टतेने पार पाडण्यात एमएमआरडीएचे योगदान अधोरेखित करते.

लांबी – १०.५४ किमी | स्थानके – ८ उन्नत | एकूण प्रगती – ९५%

गर्डर माप – ६५ मीटर लांब, ९.५७५ मीटर रुंद, सुमारे ७०० मेट्रिक टन वजन

गर्डर रचना – ३ भागांमध्ये (प्रत्येकी सुमारे २३५ मेट्रिक टन वजन, ३ मीटरहून अधिक खोल )

कार्यक्षेत्र – भायंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर (अतिशय आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीचा भाग)

अंमलबजावणी – ७, ८ व ११ जून २०२५ रोजी रात्री १.५ तासांच्या ब्लॉकमध्ये

साधने – ६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले; ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन

सहकार्य – पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे व वाहतूक पोलीस यांचे मोलाचे सहकार्य

संचालन उद्दिष्टे –

• टप्पा १: दहिसर (पूर्व) – काशिगाव (डिसेंबर २०२५)

• टप्पा २: काशिगाव – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६)

अशा महत्त्वपूर्ण टप्प्यांद्वारे एमएमआरडीए मुंबईतील नागरी वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सातत्याने पुढे वाटचाल करत  आहे.

Tags:

Related Posts