इराण-इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका: स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव , भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं; भीषण मिसाईल हल्ला, जगभरात खळबळ

इराण-इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका: स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव , भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं;  भीषण मिसाईल हल्ला, जगभरात खळबळ
Published By: Navnath Yewale
Published On:

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे . जहाजावर मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये जहाजाचं प्रचंड नुेकसान झालं आहे. हल्यानंतर मोठा स्फोट झाला. या जहाजावर 24 भातीय नाविक असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये दखल तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या जवळ ओमानच्या किनार्‍यापासून जवळपास 15 नॉटिकल मील दूर अंतरावर एका व्यावसायिक जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुममध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर जहाजाला आग लागली. त्यानंतर जाहाजामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हल्ला झालेल्या या जहाजामध्ये 24 भारतीय नाविक असल्याची महिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर लगेचच जाहाज पाण्यात बुडू लागल्यानं या जहाजावर असलेल्या क्रू मेंबर्सनी मदतीसाठी डिस्ट्रेट कॉल (एसओएस) जारी केला. फॉरवर्ड सीमेन यूनियन ऑफ इंडियाकडून या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

या जहाजावर पलाउ देशाचा झेंडा लावलेला होता. समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला आहे. मिसाईल हल्ल्यानंतर जहाज पूर्णपणे डॅमेज झालं आहे, तसेच जहजावर असलेल्या लाईफ बोटचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बचाव कार्य हे खूप कठीण बनलं आहे. या घटनेत या जहाजावरील काही क्रू मेंबर्स जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज हा कच्चं तेल आणि एलपीजी गॅस वाहतुकीचा एक महत्वाचा मार्ग आहे. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाल्यापूसन हा मार्ग व्यापारी जहाजांसाठी बंदच आहे, यापूर्वी देखील अनेकदा या मार्गावर जहाजांवर हल्ले करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा या जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यता आला आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानं आता संपूर्ण जागाची चिंता वाढली आहे.

Related Posts