मराठा आरक्षण: मनोज जरांगे पुन्हा मैदानात
7 सप्टेंबर पासून 5 टप्प्यात राज्यव्यापी दौरा; राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आडचणी जाणून घेणार
जालना: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यभर संवाद साधण्यासाठी मराठा आक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौर्याची घोषणा केली आहे. येत्या 7 सप्टेंबर 2026 पासून त्यांच्या राज्यव्यापी दौर्याला सुरुवात होणार आहे. पाच टप्प्यात या दौर्याचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना एकत्र बोलावून कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रे मिळवताना येणार्या अडचणी आणि आरक्षणसंदर्भातील प्रश्नांवर संवाद साधला जाणार आहे. या दौर्याचे नियोजन 1 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणा संदर्भातील मागण्यासाठी सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत जवळ आल्याने जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. पाटोदा (बीड) येथे सरकाच्या शिष्ठमंडळाच्या यशस्वी मध्यस्थी नंतर मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलन स्थगित केले होते. मागण्यांसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे जाहीर करत जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे उपोषण स्थगित केले होते. सरकारला दिलेली मुदत जवळ आल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्यव्यापी संवाद दौर्यांसाठी मैदानात उतल्याचे चित्र आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, “ सात डिसेंबरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल, तसेच कुणबी प्रमाणपत्राबाबत अडी अडचणी जाणून घेण्यासाठी दौरे करणार आहे. यामध्ये सभा, बैठका नसतील. ठिकाण 1 डिसेंबरपासून जाहीर केले जाईल आणि ठिकाण त्या त्या जिल्ह्यातील बांधव ठरवतील. त्यामध्ये काही टप्पे पाडता येतील. 7 दिवसांचा टप्पा, आठ दिवसांचा, 12 दिवसांचा टप्पा असे टप्पे पाडूया” असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार: ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की, नाही. यासह प्रमाणपत्र मिळवताना येणार्या विविध अडचणी जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जाणून घेणार आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी मराठा बांधवांनी दौर्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.