विजयसिंह (बाळा) बांगरची बीड पोलीसांत धाव; वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात
- Navnath Yewale
- Jul 4
- 1 min read
Updated: Jul 5
विजयसिंह (बाळा) बांगर यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करत महादवे मुंडे हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला होता. त्यानुसार विजयसिंह बांगर यांनी आज बीड पोलीसात धाव घेत मागण्यांचे निवेदन दिले.

महादवे मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी देान दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कराडवर गंभीर आरोप केले होते. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर हाडं आणि रक्त वाल्मिक कराडच्या टेबलावर होते. वाल्मिक कराड याने मारेकर्याला शब्बासकी दिली आणि गाड्याही गिप्ट केल्या, असा खळबळजनक आरोप विजसिंह बांगर यांनी केला होता या आरोपांमुळे खळबळ उडाली.
याशिवाय संदर्भात आपण स्वत: तक्रार देणार आणि पोलीस अधीक्षकांना भेटणार असंही विजयसिंह बांगर म्हणाले. तर या संदर्भात तपास अधिकार्यांना विजसिंह बांगर यांच्याकडे काही पुरावे आहेत का? आणि त्यामध्ये काय तथ्य आहे? याबाबत चौकशी करण्याचे तोंडी आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, जर पुरावे तर तात्काळ कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी म्हटलं आहे, दरम्यान जर पोलीसांना या संदर्भात काही पुरावे मिळाले तर आता वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बांगर गंभीर आरोप वाल्मिक कराडवर केले होते. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. त्याने मला बंदुक दाखवून धमकावले देखील होते. तुमच्या शैक्षणिक संस्था मला दे असंही यावेळी वाल्मिक कराड याने म्हटलं होतं, असा दावा बांगर यांनी केला होता. त्यानुसार आज विजयसिंह (बाळा) बांगर यांनी महादवे मुंडे यांनी बीडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन वाल्मिक कराड, सुशील कराड याच्या टोळीला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी बीड पोलीसांना दिले. त्यामुळे आता वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे.
Commentaires