शिंदेगटाच्या आमदाराचा कॅन्टीनमध्ये राडा
- Navnath Yewale
- Jul 9
- 2 min read
आमदार संजय गायकवाड यांची कामगारास मारहाण; शिळ,निकृष्ट दर्जाचं जेवन दिल्याचा आरोप

शिळ, निकृष्ट दर्जाचं जेवन दिल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी कामगारास मारहाण केली. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीमध्ये हा प्रकार घडला. आमदार गायकवाड कॅन्टीनकडून दिलेलं शिळ व निकृष्ट दर्जाचं जेवन हातात घेवून आमदार गायकवाड बनियान,टॉवेलवर कॅन्टीनमध्ये आले. डाळीच्या पार्सलचा सुगंध घेत त्यांनी कॅन्टीन कामगारास मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या राड्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला असून विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांना आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमधून रात्री जेवन पाठवण्यात आलं होतं. दरम्यान या जेवनातील डाळीचं अन्न शिळ, व निकृष्ट दर्जाचं होतं असा गायकवाड यांनी आरोप केला. शिळ जेवन हातात घेवून आमदार गायकवाड चक्क बनियान, टॉवेलवर कॅन्टीनमध्ये आले अन्नाचा सुगंध दाखवत गोंधळ घातला.
दरम्यान, आमदार गायकवाड यांनी जेवन देणार्या कामगारास बोलावून घेत त्यास जेवनाचां सुगंध घेण्यास भाग पाडून ‘ असे निकृष्ट आणि शिळ अन्न लोकांना देतोस का? हरामखोरा ’ असे म्हणत कामगारास मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या राड्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आमदार गायकवाड स्वत: प्रतिक्रिया देत म्हणाले की मारहाण करायला नाको होती. पण शिळं अन्न देवून इतरांच्या आरोग्याशी खेळ आहे त्यामुळे हा प्रकार घडला.
सत्तेची मस्ती दुसरं काय:
कॅन्टीनमध्ये मिळणारा आहार निकृष्ट दर्जाचा आहे, कॅन्टीनला राशन पुरवठा करणारं सरकार तुमचं, कॅन्टीनवर नियंत्रण ठेवणारं सरकार तुमचंच मग हा असा प्रकार घडतोच कसा त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई अपेक्षीत असताना केवळ कायदा हातात घेवून कामगारास मारहाण म्हणजे सत्तेची मस्ती दुसरं काय अशा प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.
दोषी आमदारावर कारवाई करा:
कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवन प्रकरणी कायदा हातात घेवून थेट कामगारास मारहाण करणं हे गैर आहे. त्यामुळे जोकोणी कायदा हातात घेईत त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विधानभवनातही पडसाद
आमदार संजय गायकवाड यांच्या कमगार मारहाण प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. सकाळच्या सत्रात आमदार अनिल परब यांनी आंमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कामगार मारहाण प्रकणावर बोट ठेवत जोरदार हल्ला बोल केला. आमदार गायकवाड यांनी चक्क टॉवेलवर येऊन कामगारास मारहाण करणं हे निंदणीय असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी मारहाण टॉवेलवर येऊन केली काय आणखी कशावर येऊन केली ती मारहाणच आहे ती चुकीचे आहे असे स्पष्टीकरण देत विषय थांबवला.
Comments