top of page


उदरनिर्वाहासाठी जन्मदातीने सहा लेकरांना विकलं? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना;
नाशिक: उदरनिर्वाहासाठी व्यवसाय, मजुरी याही पलिकडे वेठबिगाराचाही मार्ग अवलंबल्याचे ऐकिवात, नजरेश. पण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी थेट पोटच्या सहा लेकरांना विकण्याचा जन्मदात्या आईवर प्रसंग यावा तो ही महाराष्ट्रात हे पटण्यासारखं नसलं तरी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून ही ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने एक,दोन नाही तर तब्बल सहा लेकरांना पैसासाठी विकल्याचं समोर आलं आहे. त्र्यबंकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी येथील बच्चुबाई अडावनेे वय 45 वर्षे यांना एकून 14 आपत्य झ
3 hours ago2 min read


विधीमंडळ सभागृहात तुकडे बंदी सुधारणा विधेयक मंजूर
शेत-शिवारातील निवासीजागांसाठी महत्वाचे; 60 लाख लोकांना फायदा नागपूर: बहूचर्चित आणि महत्वाचं तकडे बंदी सुधारणा विधेयक विधीमंडळात आज एकमतानं मंजूर झालं. त्यामुळे छोट्या तुकड्यांमध्ये घरं बांधलेल्या नागरिकांना दिलासा मिळाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरानुसार या विधेयकामुळं ज्यांनी जमिनिचे छोटे- छोटे तुकडे घेऊन घरं बांधली त्यांना या कायद्याचा फायदा होईल.
4 hours ago1 min read


नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलनातील महिलेचं टोकाचं पाऊल
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आंदोलनकर्त्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशानावेळी धरणे आंदोलनात एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यशवंत सीताबाई धांडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या महिलेनं नाव आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम परिसरात ही घटना घडली. आदोलन करणार्या महिलेनं आत्मदहन केल्यानं पालिस दलाची मोठी तारांबळ उडाली. यशवंत स्टेडियम परिसरात पुण्यातील खराडी- चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी आंदोलन करण्यात येत होते. बोगस
5 hours ago1 min read


गुप्त एसआयटी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी स्थापन केली का? - जरांगे पाटील
पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्या विकास कामावर धंनजय मुंडे सोबत बंद दराआड चर्चा करतात! केज: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेवून संतोष देशमुख यांना अभिवादन केले. वर्ष उलटूनही हे सरकार संतोष भैय्या देशमुख यांना न्याय देऊ शकलं नाही. संतोष भैय्याच्या हत्येचा मुख्यआरोपी वाल्मिक कराड जेलमधून बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. तसं झालच तर राज्यात एकही चाक फिरु देणार नाही. मुळात वाल्मिक कराड जेलच्या बाहेर येणा
6 hours ago2 min read


देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी मस्साजोगला राज्यव्यापी बैठक- जरांगे पाटील
सरंपच संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण; मस्साजोग करांनी पाळला काळदिवस बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 9 डिसेंबर एक वर्ष पूर्ण झाले. मस्साजोग ग्रामस्थांनी आजचा काळा दिवस पाळून दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी न्यायदेवतेल कोणतं साकडं घालायचं असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगला भेट दिवंगत संतोष देशमुख यांना अभिवादन केले. देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी लवकरच मस्साजोगमध्
6 hours ago2 min read


कष्टकर्यांचा तारणहार हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
पुणे: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास धेतला. आढाव यांच्या निधनाने कष्टकर्यांचा तारणहार, सर्वसामन्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारार्थ पुण्यातील पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपच
1 day ago1 min read


धनंंजय मुंडे अजितदादा, फडणवीसांच्या पायावर पडलं, त्यांनी क्लिन चिट दिली- जरांगे पाटील
नवी मुंबई/ पनवेल: माझ्या घातापात प्रकरणातील तीनही आरोपींनी कबुली दिलेली असताना धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी अटक नाही. धनंजय मुंडे अजितदादा आणि फडणवीसच्या पायावर पडलं, त्यांनी क्लिन चिट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत केला. नवीमुंबई क्षेत्रातील मराठा बांधवांनी पनवेल येथे मराठा भवन स्थापन केले आहे. काल रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल मध्ये जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे
1 day ago2 min read


सक्षम ताटेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी !
नांदेड: शहरात घडलेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची प्रयसी आचल मामीडवार हिच्या कुटुंबीयांनी सक्षम याचा खून केला होता. या प्रकरणातील एकून आरोपींची संख्या आता आठवरती गेली आहे. नांदेडमधील इतवारा भागातील संघसेन नगर येथील 20 वर्षीय सक्षम ताट या तरुणाचा सिद्धनाथपुरी भागातील 19 वर्षीय आच मामीडवार हिच्यासोबर प्रमसंबंध होते. मागील तीन वर्षापासून ते एकमेकांसोबत होते. या दोधांच्या प्रेम प्रकरणाल
2 days ago1 min read


उद्यापासून विधीमंडळाचे नागपूरात हिवाळी अधिवेशन
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; स्थानिक स्वराज संस्थां निवडणुकांची रणधुमाळी, अधिवेशन ‘वादळी’ ठरणार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकर्यांचा असंतोष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्
2 days ago1 min read


कबुतरखान्याच्या वाद पुन्हा पेटणार? जैन मुनी निलेशचंद्र आक्रमक; आता कबुतररक्षक तयार करणार !
मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. कबुतरखान्यायासाठी जैन समुदाय आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोरक्षकांप्रमाणे आम्ही आता कबुतररक्षक तयार करणार असल्याचे ते म्हणाले. कबुतरखाना बंदीमुळे एक लाख कबुतरांना प्राण गमवावे लगल्याचंही ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया द
3 days ago2 min read


गोवा हादरले : मध्यरात्री नाईटक्लबमध्ये स्फोट, 23 जणांचा मृत्यू
सिलेंटरचा स्फोट, नाईटक्लबला आग, मृतांमध्ये 4 पर्यटकांचा समावे गोवा: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लक जळून खाक झाला. त्यात एकून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृता
3 days ago1 min read


डॉक्टला मृत्यूस कारणीभूत ठरवत पित्यासह नातेवाईकांचा हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा!
बीड: शहरातील गुरुदत्त हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या कु.संस्कृती बारगजे हिचा दि.3 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरच्या निश्क्रियतेमुळे सुविधांअभावी वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने संस्कृतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. निश्क्रिय डॉक्टर व त्यांची पाठराखण करणार्यांवर कठोर करावाईच्या मागणीसाठी मयत कु. संस्कृतीचे पिता संजय बारगजे यांनी हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील पिंपळनेर येथील 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या
3 days ago1 min read


वनसंपदेच्या संवर्धनासाठी तलाठी कार्यालयासमोर अन्नत्याग!
आंदोलना चौथा दिवस; पदाचा गैरवापर करून उपाय योजनांचा विसर पडलेल्या वनकर्मचार्यावर कारवाईची मागणी बीड : तालुक्यातील वनअधिनियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. अवैध वृक्षतोड, अवैध लाकूड वाहतूक करण्यात येत असून राखीव वनक्षेत्रात अतिक्रमणाला वनविभागाच्या कर्मचार्यांकडूनच खतपाणी घालण्यात येत आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करणार्या वनरक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी अशोक जायभाय यांनी गोमळवाडा येथील तलाठी कार्यालयासमोर दि. 2 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील
3 days ago1 min read


तपोवनातील प्रस्तावीत प्रदर्शन केंद्राची निवीदा रद्द नाशिकमध्ये 15 हजार वृक्षारोपन करणार - मंत्री गिरीश महाजन
नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33
3 days ago1 min read


अंबानीवंर मोठी कारवाई; एक हजार कोटींची मालमत्ता जप्त!
मुंबई: अनिल अंबानी यांच्या अडणीच सतत वाढत चालल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधातील कारवाई अधकि कडक करत आणखी 1120 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधीही ईडीने 1452 कोटी आणि 7500 कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या हा संपूर्ण मामला रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि यश बँक यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूहावर सतत कारवाई होत आहे. नव्या कारवाई ईडीने 18 पेक्षा जास्त मालमत्ता, फिक्सड डिपॉझिट, बँक खाते आणि सूचिब
3 days ago2 min read


बीडच्या झेडपीतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
शिक्षणविभागात खळबळ यूडीआयडी कार्ड सादर न करणं भोवलं बीड: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्या लाटल्याचे प्रकरण सध्या राज्यीरातील जिल्हापरिषदांमध्ये गाज आहेत. नागपूर, नांदेड, बीड जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यातच काल शिक्षकांनी संपाचा इशारा दिला होता. शिक्षक संपाच्या तयारीत असतानाच बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीवर रुजू झालेल्
3 days ago2 min read


महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक
3 days ago2 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
4 days ago3 min read


सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचा आदेश कायम; आदेशात तीन तारखांचा उल्लेख
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. बर्याच वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या अडचणी दिसून येत आहेत. काही नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली. नगापूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात त्यावर सुन
4 days ago2 min read


मुंबईत माराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार, मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तरच मिळेल!
मुंबई: महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही, ते ही मुंबईत, विश्वास बसणार नाही. पण होय हे खरं आहे, मुंबईच्या उपनगरातील भाईंदर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माच्या नावे घेत तसेच जात समल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे. भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात रवींद्र खरात हे फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मात्र, “मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तर
5 days ago1 min read
bottom of page