top of page

अजित दादाच्या अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स पण पायलटने ...! नागरी उड्डयन मंत्रालयाची राज्यसरकारला माहिती


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारपे मिड-साइज बिझनेस जेट लेर्जेट -45 बुधवारी (दि.28 जानेवारी2026. सकाळी 8:44 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना कोसळले आणि क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. या भीषण अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला.


मंत्रालयाने ही माहिती बारामती विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) अधिकार्‍यांच्या  निवेदनाच्या आधारे  जाहीर केली आहे. दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या अवघ्या एक मिनिट अधीच विमानाला  लँडिंगसाठी  क्लिअरन्स  देण्यात आली होती. दरम्यान, नागरी उड्डयन मंत्रालयाने स्पष्ट केले की लेर्जेट-45 ला व्हिज्युअल मेटिओरोलॉजिकल  कंडिशन्स मध्ये लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता. म्हणजेच रनवेवरील दृश्यता इतकी होती की पायलटने  स्वत:च्या निर्णयक्षमतेवर विमान जमिनीपासून आणि इतर विमानांपासून सुरक्षित अंत राखत उतरवणे अपेक्षीत होते.


मंत्रालयातील निवेदनातील मुद्दे : मंत्रालयाच्या म्हणण्यानूसार, विमानाच्या क्रूने वार्‍याची दिशा आणि  दृश्यतेबाबत  माहिती  मागितली होती. एटीसी कडून त्यांना वारा शांत असल्याचे आणि दृश्यता सुमारे 3.000 मीटर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर विमानाने रनवे 11 साठी फाइनल अप्रोचवर असल्याची माहिती दिली. मात्र त्या क्षणी पायलटला रनवे स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी ‘ गो-अराउंड’ प्रक्रिया सुरू केली. गो-अराउंडनंतर एटीसी ने विमानाची स्थिती विचारली असता, पायलटने पुन्हा एकदा फाइनल अप्रारेचवर असल्याचे सांगितले. एटीसी ने पायलटला रनवे दिसत  असल्याची  पुष्टी  देण्यास  सांगितले. त्यावर पायलटने  “सध्या रनवे दिसत नाही, दिसल्यावर कळवतो” असे उत्तर दिले.


काही सेकंदांनंतर पायलटने रनवे दिसत असल्याची माहिती दिली, त्यानंतर विमानाला रनवे 11 वर लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पायलटने लँडिंग क्लिअरन्सची अधिकृत पुष्टी दिली नाही. 8:44 वाजता आगीच्या लाटा, मलबा जमिनीवर : यानंतर काही क्षणांतच सकाळी 8:44 वाजाता एटीसी अधिकार्‍यांना रनवे 11 च्या  डाव्या बाजूला आगीच्या लाटा दिसल्या. त्या ठिकाणी विमानाचा मलबा कोसळल्याचे स्पष्ट झाले, असे मंत्रलयाने सांगितले.

 

Comments


bottom of page