top of page

उद्योजकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्टिंग ऑपरेशनचा प्रयत्न, तो फडणवीसांकडेही गेला होता पण..! शिवकुमार यांचा खळबळजनक दावा

18 minutes ago
1 min read

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी एका मुलाखातीत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. एका उद्योजकाने आपल्यासह केरळेच मुख्यमंत्री व्ही. डी सतीशन यांच्या स्टींग ऑपरेशनचा प्रयत्न केला होता. त्या उद्योजकाने ‘ मेटा’ चे स्मार्ट चष्मे घातले होते. असा आरोप शिवकुमार यांनी केला आहे.


शिवकुमार यांनी एका कन्नड चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधील आरोपांमुळे कर्नाटकातील स्टिंग ऑपरेशनवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित उद्योजकाने केवळ काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या स्टिंग ऑपरेशनचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, ही घटना आपल्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना टार्गेट करण्यासाठी एका मोठ्या स्टींग ऑपरेशनच्या तयारीचा भाग होता. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांच्या भेटीवेळीही मेटा चष्माचा डोळ्यांवर लावला होता. तीच व्यक्ती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एका केंद्रीय मंत्र्यांनी भेटली होती. पण त्यावेळी मेटा चष्मा लावला नव्हता.


दरम्यान, स्टींग ऑपरेशनचा उलगडा कसा झाला, याची माहिती देताना शिवकुमार म्हणाले, आपल्याला भेटण्यासाठी संबंधित उद्योजकाने अधिकार्‍यांमार्फत वेळ घेतली होती. सुरुवातीला उद्योगविषयी चर्चा झाली. त्यानंतर हळूहळू त्याने राजकीय विषयांकडे चर्चा वळविली. बूथ स्तरावरील रणनीती, राजकीय घटनाक्रम यावर बोलू लागला. ही चर्चा आणि त्याने डोळ्यांवर लावलेला मेटा स्मार्ट चष्मा पाहून संशय आला. त्यानंतर आम्ही व्यक्तीच्या गाठी-भेटी, इतर राजकीय नेत्यांच्या भेटींची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.


चौकशीमध्ये आढळून आले की, संबंधित व्यक्ती सतीशन यांनाही भेटली होती. त्यावेळीही त्याने असाच चष्मा लावला होता. त्याने केवळ मी आणि सतीशन यांच्या भेटीवेळीच हा चष्मा घातला होता, असे समोर आल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. मात्र, तो उद्योजक कोण होता, याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

Comments


bottom of page