top of page

एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कमद यांनीच घेतली ?रामदास कदमांवर भाजपचा पलटवार

2 hours ago
2 min read

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन केलेल्या 500 कोटींच्या खळबळजनक आरोपानंतर, पत्रकार परिषदेतून ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. पुरावा म्हणून जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरून आता राजकीय वादंग उठलं असून महायुतीमधील भाजपा- शिवसेना आमने- सामने आले आहेत. त्यातच शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांची जवळीक होती, असे म्हणत आंदोलनकाळात त्यांनी घेतलेल्या भेटीचे, जेवतानाचे फोटो दाखवले. तसेच, ही ऑडिओ क्लिप एआय नसून भाजपचीच असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी एबीपी माझी संवाद साधताना रामदास कदम यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे.


रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संजय राऊतांसारखं कृत्य करू नये, कुठलीही गोष्ट बोलण्यापूर्वी वरिष्ठांसोबत चर्चा करायला हवी, यात आम्ही आणि त्यांचे नेते उदय सामंत हे सातत्याने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होतो. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम रामदास कदम यांनी करू नये, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा पलटवार प्रसाद लाड यांनी केला. शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो कारण एकनाथ शिंदे केवळ शिवसेनेचे नेते नाहीत, तर महायुतीचे नेते आहेत, आमचे नेते आहेत. रामदासभाई हेही आमचे नेते आहेत. पण त्यांनी अशी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून ती घ्यायला हवी होती, असेही लाड म्हणाले. जरांगे पाटलांचे आरोप आम्ही मान्य करणार नाहीत. त्यांनी माझंही नाव घेतलं की, प्रसाद लाड आता कुठे गेले, ते भेटत नाहीत. मी केवळ मराठा समाजाचं काम सरकारच्या माध्यमातून करत होतो, माझं रोज त्यांना भेटण्याचं काम नाही.

नेत्याला खुष करून मुलाचे पदं शाबीत राखण्यासाठी रामदास कदम बोलतात- प्रविण दरेकर

भाजप आमदार प्रविण दरेकर यांनीही रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला. भाजपला दोष देत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. ज्यावेळेस फडणवीस यांच्यावर व्यक्तीगत टिका होऊ लागल्या त्यावेळेस आम्ही रिअ‍ॅक्ट झालो. ते काही लपून राहिलं नाही. पडद्याआड राहून जरांगेंना ताकद देणारे कोण होते त्याचाही शोध यशावकाश होईल. फडणवीस साहेबांना कोण बदनाम करत होतं. आपल्या मुलाचं मंत्रीपद आणि दुसर्‍या मुलाचं प्रदूषण मंडळ शाबीत ठेवण्यासाठी , त्याचबरोबर आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी, प्रमोशन मिळविण्यासाठी रामदास कदम बोलत आहेत. तुम्ही जसे कडक आक्रमक बोलता तसं आम्हालाही बोलता येतं. भाजपच्या कोणत्या नेत्याने शिंदेंना संपवण्याचा विडा उचलला आहे. नपेत्याला संपवण्याचे षडयंत्र भाजपला सोबत घेऊन, शक्य नाही. आपल्या नेत्यावर बोला, आम्ही सांगतो चौकशी झाली पाहिजे परंतु भाजप जबाबदार आहे, भाजप षडयंत्र करतंय हे खपवून घेणार नाहीत. रामदास कदम यांच्या प्रसाद लाड यांच्या जवळकीच्या प्रश्नावर दरेकर म्हणाले प्रसाद लाड जरांगे पाटलांचं आंदोलन सोडवण्यासाठी गेले होते. जरांगे पाटलांच्या बैठका ऑनलाईन असतात, त्यांच्यासोबत जेवन केलं काय बिगडलं असंही दरेकर म्हणाले.

Comments


bottom of page