एकाच नंबरवरून तब्बल 22 हजार मतदारांची नोंदणी: निवडणुक अयोगावर नवा बॉम्ब , भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप

नागपूर : राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे नागपूर पदवीधर मतदरासंघासाठी उद्या मतदान होत असताना, एकाच क्रमांकावरून 22 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत निवडणूक आयोगाला वारंवार सांगितल्यावरही त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगून निवडणूक अयोग भाजपासाठी काम करीत आहे का? असा सवाल काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना अतुल लोंढे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यासोबतच देशात महागाई, बेरोजगारी, पेपरफुट आणि उद्योजकांचे प्रश्न आहेत. याबाबत भाजप स्पेशल अपयशी ठरली आहे. त्यामुळेच आता निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप गोलमेल करीत असल्याचा अरोप लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
यापूर्वीही पदवीधर निवडणुकांमध्ये 8 हजार 744 मते दुबार आल्याची माहिती समोर आली. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणुक आयुक्त आणि नागपूर निवडणूक अधिकार्यांना याबाबत पुराव्यासह माहिती दिली. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर आता एका ‘5432154321’ या विशिष्ट क्रमांकावरुन एकाच वेळी 22 हजार मतदार कसे काय नोंदविण्यात आले. निवडणूक आयोगाला ते कळले कसे नाही? हा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत निवडणूक अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांना माहिती दिली असून त्यांनी तत्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मतदार यादीमध्ये किती बनावट आधार व पॅन कार्डचा वापर करण्यात आला, हे सत्य आयोगाने बाहेर काढवे असेही ते म्हणाले. यावेळी अशाप्रकारे बोगस मतदार करणार्यावर काँग्रेस वॉच ठेवणार असून त्याबाबत बुथला माहिती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अशा मतदारांना काँग्रेस सोडणार नाही, असंही अतुल लोंढे म्हणले.



Comments