top of page


नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, जमिनीला भेगा, घराच्या भिंती थरथरल्या
नाशिक: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सायंकाळी 7:23 वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. अचानक जमिनीला भल्या मोठ्या भेगा पडल्या. तर घराच्या भिंती थरथरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात वारंवार असे सौम्य धक्के बसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भूकंपाने जमिनी हादरल्या, शेती जमिनींना भेगा पडल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि परिसरात
Jul 271 min read


कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म ची सुरुवात
कोकणातील पर्यटनाला अधिक व्यापक ओळख मिळावी, स्थानिक होमस्टे चालकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना व्यवसायवाढीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने KokanHomestays.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे. कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, जैवविविधता, मालवणी खाद्यसंस्कृती आणि निसर्गसौंदर्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अनेक छोट्या होमस्टे चालकांकडे स्वतःची वेबसाइट किंवा डिजिटल माध्यमातून पर्यट
Jul 201 min read


बीड जिल्ह्यासाठी सिद्धार्थ सोनवणे यांची ‘मानद वन्यजीव रक्षक’ पदी नियुक्ती, वन्यजीव संरक्षण व संवर्धन क्षेत्रात जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब
बीड : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी घडामोड घडली असून, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक श्री. सिद्धार्थ धोंडीराम सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाने मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. 13 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णय क्र. डब्ल्यूएलपी-03.26/प्र.क्र.83/फ-1 नुसार राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बीड जिल्
Jul 142 min read


मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट, खरिप पेरणीचा वेग मंदावला! पावसाची दडी, शेतकरी हवालदील; 65 % पेरणी, लाखमोलाचं बी-बीयाणं मातीत?
बीड : मराठवाड्यात यंदाच्या खरिप हंगामातील परेणीची स्थिती दिवसें दिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपवत आला असतानाही विभागात केवळ 65 % पेरणी पूर्ण झाली आहे. पवावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत शेतकरी अद्याप पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेतावर झाली आहे. सर्वाधिक पेरणी नांदेड जिल्ह्यात 78%
Jul 143 min read


मराठवाडा हादरला: परभणी, हिंगोली, नांदेडला भूकंपाचे हादरे गाड झोपेत असताना मध्यरात्री 1:37 वाजता भूकंप; 4.4 रिश्टर स्केल नोंद
परभणी/ नांदेड: महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 1 :37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांवर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या म
Jul 92 min read


केरळच्या वायनाडमध्ये भयानक भूस्खलन, ढिगार्याखाली लोक मुंगीप्रमाणे दबल्याची भीती
वायनाड: सध्या संपूर्ण देशात पावसाचा हाहा:कार झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले आहे. पावसाने घातलेल्या या थैमानामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाची संपूर्ण यंतणा कामाला लागलेली असली तरीही विध्वंस टाळता येत नाही. दरम्यान, सध्या पावसाच्या रौद्ररुपामुळे एक मोठे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाचा व्हिडीओ सध्या समोर आ
Jul 71 min read


नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरीचे पाणी शहरात घुसायला सुरुवात; दुतोंड्या मारुती पाण्यात
नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.यासोबतच नाशिकला पाणी पुरवठा करणार्या गंगापूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नाशिक शहरात आता पाणी घुसण्यात सुरूवात झाली आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणातून 9 हजार 848 क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या रामकुंड
Jul 71 min read


video/राज्यात पावसाचा हाहाकार: पुणे- मुंबई वाहतूक खंडीत एक्सप्रेसवेला नदीचे स्वरुप, मिसींग लिंकवर दरड कोसळली ; स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आता शिरला , सोशल मीडीयावर व्हीडीओ व्हायरल
मुंबई: प्रचंड गाजावाजा करून बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महामार्गाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याचा प्रकार घडला.स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. त्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर छतामधून माती आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावरप कोसळत होता. त्यामुळे सध्या मिसिंग लिंकवरील
Jul 62 min read


आळंदीत इंद्रायणीला महापुर जनजीवन विस्कळीत; चारही पुलावरील वाहतूक बदं , भाविकांनी देहू, आळंदी ऐवजी पुण्याला येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत सोमवारी (दि.6) इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीची गंभीर दखल घेत प्रशासनाने आळंदीला जोडणारे प्रमुख चारही पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहेत. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, भाविकांनी सध्या आळंदीकडे न येता जिथे असाल तिथेच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा व राज्य प्रशासनाकडून करण्यात आला आहे. उद्या (दि.8) माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदीतून पंढरीसाठी प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्याल
Jul 63 min read


आभाळ फाटलं!: मुंबईसह कोकणाला झोडपलं, राज्यात पावसाचा हाहाकार मुंबई, उपनगरात अतिमुसळधार, सखल भाग पाण्याखाली, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप
मुंबई: महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरांतील रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून सखल भागात 2 ते 3 फूटापर्यंत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि इमारतींमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच
Jul 12 min read


युरोपमधील “अंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो”मध्ये सिद्धेश कदम यांनी केले राज्याचे प्रतिनिधीत्व
युरोपमधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो” मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश कदम यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लास्टिक रिसायकलींग आणि सक्युर्लर इकोनॉमी या चर्चा सत्रात सिध्देश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक रिसायकलींगमध्ये कोणती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे “ग्लोबल पॉलिमर ग्रुप
May 82 min read


महाराष्ट्रदिन विशेष : महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणाचा सर्पराज्ञीत सौंदर्य श्रृंगार
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जेव्हा सृष्टी निष्पर्ण होते, तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपुष्प ‘ताम्हण’ जांभळ्या रंगाच्या विविध छटांचा मुकुट चढवून दिमाखात उभा राहतो. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव येथील ताम्हण वृक्षाला आलेला फुलांचा बहर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. निसर्ग सौंदर्याचे प्रतीक तागडगावच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र परिसरात ताम्हणाचे झाड जांभळ्या रंगाच्या विविध रंगछटांच्या फुलांनी लगडले आहे. कोठे गडद जांभळा, कोठे फिकट लव्हेंडर, तर कोठे गुल
Apr 302 min read


महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्या
Apr 272 min read


उष्णतेचा कहर! अकोल्यात पारा 46 अंशावर, परभणीत उष्माघाताचा मृत्यू ; राज्यात अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी
मुंबई: राज्यभरात उष्णतेचा पारा प्रंचडं वाढला आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडखा वाढत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. आकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तपामाण 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचाबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अकोल्यात तपामानात सातत्याने वाढ ह
Apr 262 min read


राजा कायम राहील पण..., यंदाही महापूर..; देशाची संरक्षस्थिती तणावात! भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताचे निष्कर्ष समोर
बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला सुमारे 370 वर्षापासूनची असलेल्या भेडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सुर्यास्तच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सुर्यादयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील मात्र ते तणावात राहती
Apr 202 min read


बारामतीत 6 तर राहुरीतील चार उमेदवारांनी घेतली माघार पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी; पार्थ पवार पाठोपाठ नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाना
बारामती/ राहुरी: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका धेतल्याने बारामतीत पोटनिरवडणुक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिवशी आणखी काही घडामोडीची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यातच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील रा
Apr 82 min read


एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय
एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅ
Mar 142 min read


जिष्णू देव वर्मा महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत. सुरुवातील मुख्य सचिव राजेश
Mar 102 min read


महाराष्ट्र प्रदूषण नियंतण मंडळाचा औद्योगिक अस्थापनांसाठी मोठा निर्णय; संमतीपत्र मंजूरी व नुतनीकरणाचा कालावधी केला 50 टक्क्यांनी कमी
मुंबई: राज्य शासनाच्या इज ऑफ डुईंग बिजनेस धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या उदयोग उभारणी, संमतीपत्र मंजुरी व त्याचे नुतनीकरण यासाठी मंजूर करण्याचा कालावधी हा ५० टक्क्यांपेक्षा कमी केल्याने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाचे इज ऑफ डुईंग बिजनेस धोरण व राज्य शासनाने आखलेले विकसित महाराष्ट्र २०४७ या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना हरित संवर्गातील उदयोग उभारणीसाठी, उदयोग सुरू
Feb 241 min read


महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट , 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानत काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमान वाढ होताना दिसत आहे. वातावरण गरमी जाणवत असताना अता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकून 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्
Feb 231 min read
bottom of page