नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read

नाशिक: सिंहस्थकुभ मेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात पर्यापरणप्रेमी व नाशिककरांचे आदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनावर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एक्सपोस्टमुळे पर्यावरणप्रेमी संतापले मधल्या वृक्ष तोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असा सवाल मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केल्याने पर्यावरणप्रेमी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.
नितेश राणे यांच्यावर आम्हाला किव येते. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक तरी कळतो का? अरे बाबा हे वृक्ष ऋषीतुल्य आहेत. झाडे ऑक्सिजन देतात व जीवन फुलवितात, माणसं जगवतात. बकरी आणि झाडांचा विषय एकत्र करुण राणे विषय भरकटवत आहे असं नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी म्हटलं आहे. बकरी आणि झाडांचा संबंध आहे का?.. यांच्या डोक्यात कोंबडी, बकर्याच भरल्या आहेत अशी टीकाही पर्यावरणप्रेमींनी नितेश राणेंवर केली.
सयाजी शिंदेचे एका वाक्यात उत्तर
मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांना प्रश्न विचाला असता ते म्हणाले “असल्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही” या उलट ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू- संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत हाते याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपले मंत्रिपद आणि आपले राजकारण टिकणे यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाड तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त राजकीय स्वार्थ साधायचा असंच म्हणावं लागेल.



Comments