मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांवर आदळले सुदैवाने हानी टळली; लँडिंगच्यावेळी घडली घटना
- Navnath Yewale
- 17 minutes ago
- 1 min read

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरइंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याची माहिती आहे.लँडिंगच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअरइंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडले. हैदराबादवरून मुंबईला आलेले एअर इंडियाच्या विमानाचे पंख मुंबईवरून कोइंबतूरला जाणार्या एअरइंडियाच्या विमानाच्या पंखांना धडकले. या घटनेवेळी दोन्ही विमानात प्रवासी होते अशी माहिती आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. डीजीएने या प्रकरणाची चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या दुर्घटनेवर इंडिगो एअरलाईन्सने म्हटले आहे की. 3 फेब्रूवारी 2026 रोजी हैदराबादहून मुंबईला आलेल्या आमच्या 6 ई 791 या विमानाचे विंगटिप, लँडिंगनंतर टॅक्सींग करत असताना दुसर्या एका एअरलाइनच्या विमानाला धडकले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि विमान पार्किंगमध्ये लावल्यानंतर ते खाली उतरले. विमानाची देखभाल तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकार्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आमचे प्रवासी, कर्मचारी आणि विमानांची सुरक्षा ही आमची सर्वोत्तम प्राथमिकता आहे.
एअर इंडिगोनेही या बाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे, एअर इंडियाने म्हटले की, 3 फेब्रूवारी रोजी मुंबईहून कोइम्बतूरला जाणारे विमान एआय 2732 उड्डाणापूर्वी टॅक्सीवेवर थांबलेले असतानार दुसर्याएका एअरलाइनच्या विमानाशी धडकले. दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली. ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखाला नुकसान झाले आहे.
दरम्यान एअरइंडियाने पुढे म्हटले आहे की, या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणू, पुढील तांत्रिक तपासणीसाठी विमान थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले असून, आमचे ग्राऊंड कर्मचारी त्यांना लवकरात लवकर त्यांच्या गतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. आता या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणाला देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी प्रवाशांची आणि कर्मचार्यांची सुरक्षा आमचे सार्वोच्च प्राधान्य आहे.



Comments