पर्यावरण मंत्री पंकजा मुडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठी दुर्घटना टळली !
- Navnath Yewale
- 14 hours ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या पर्यावरण पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आढल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जात होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी दौर्यावर होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे नियोजित सभा पुढे ढकण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून लातूरकडे उड्डण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला हा दोष लक्षात आला. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण तातडीने रद्द करण्यात आले आणि एक मोठा अनर्थ टळला.
पंकजा मुंडे या मराठवाडा प्रदेशात विविध जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. आज त्यांचा दौरा लातूर जिल्ह्यात नियोजित होता. जिथे अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॉप्टरने लातूरला जाण्याच्या वेळी, उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये काही समस्या उद्भवल्याचे उघड झाले. परंतु त्यांनी तात्काळ दुसर्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करून पुढील प्रवासाची तयारी केली. लातूरमध्ये आज विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये सभांचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. या घटनेमुळे प्रचाराच्या वेळेत किरकोळ बदल झाले असले, तरी एकून कार्यक्रम सुरळीतपणे पार पडणार आहेत.
पंकजा मुंडे यांच्या टीमने या बिघाडाची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही आणि मुंडे स्वत: सुराक्षित आहेत. काल छत्रपती संभाजनगरच्या वाळूज परिसरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी सतत हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्यामुळे माझी आई देव पाण्यात ठेवते. विशेष म्हणजे या वक्तव्यानंतर अवघ्या दुसर्याच दिवशी, आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे त्यांच्या विधानाची वार्ता राजकीय वर्तुळात रंगली आहे.



Comments