दिशा सालियान प्रकरणावरून शिवसेना (उबाठा)नेत्याचा इशारा

मुंबई: मुुुंबई उच्च न्यायालयाने सहा वर्षापूर्वी झालेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. त्यानंतर सीबीआयने वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी अनेक बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या प्रकरणी कोणाचेही नाव घेता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सतीश सालियान यांनी माजी मंत्री अदित्य ठाकरे यांच्या विरोधात 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणावर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे नेते व आमदार वरुण सरदेसाई यांनी टीका आणि आरोप करणार्यांनाव थेट खुले आव्हान दिले आहे. तुम्ही पुरावे द्या अन्यथा आम्ही जास्त काळ शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा या प्रकरणावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मााजी मंत्री आदित्य ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. त्याबाबत कोणाकडेच पुरावे नाहीत. या प्रकरणात कसलाच पुरावा नाही, केवळ प्रसिद्धिसाठी मीडियासमोर बडबड करत असल्याची टीका आमदार वरूण सरदेसाई यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत, त्यांना माझे खुले आव्हान आहे की त्यांनी एक तरी पुरवा दिला पाहिजे. पुरावे नसतील आणि आरोप केले जात असतील तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करूच. परंतु आजा आम्ही फार काळ शांत बसणार नाही, असा थेट इशाराच वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. यास आरोपानंतर त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली. मी दिशा सालियान यांना ओळखत नाही. मी त्यांना कधीही भेलेलो नाही, असे त्यांनी त्या ट्विटमध्ये स्पष्ट केले. परंतु त्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे.
या प्रकरणी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांनी 500 कोटींची आब्रूनुकसानीची नोटीस पाठवली. ही नोटीस देण्यासाठी ते खुद्द मातोश्रीवर निघाले होते. परंतु कलानगरच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना अडवले आणि आदित्य ठाकरेंच्याा वकिलांनी 500 कोटींच्या दाव्याची नोटीस स्वीकारली. दरम्यान, आता आदित्य ठाकरे या नोटिशीला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Comments