पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
- Navnath Yewale
- 8 hours ago
- 2 min read

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्याने चौथ्या दिवशी सुनेत्रावहिनींनी उपवमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं सांगण्यात आलं.
आत, सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं सांगण्यात आलं. आता, सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत, सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकही जारी केले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर केवळ अर्थ खाते वगळून अजित पवारांकउे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेता पवार यांच्याकउे देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. त्यामुळे आता पुणे आणि बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने चर्चा होत असतानाच त्याचीही माहिती समोर आली आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जाबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आली असून शासनाने परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार 9 फेब्रूवारीला मंत्रालयीन कार्यालयात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मंत्रालयातून अजित पवार राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देत होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. अजित पवार हे बारामतीचे सुपुत्र असल्याने बारामती बंद ठेऊन आपल्या लाडक्या नेत्याबद्दल बारामतीकरांनी आपुलकी व जिव्हाळा जपला. तसेच, बीडचे पालकमंत्री म्हणून गेल्या काही महिन्यात अजित पवारांनी बीडकरांशी जोडलेलं नातंही तितकच जिव्हाळ्यांच होतं. त्यामुळे बीडमधील जनतेनंही बंद पाळून अजित दादांना श्रद्धांजली वाहिली होती. आता, अजित पवार यांच्यावर बीडच्या पालकत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच येणार आहे. दरम्यान, बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी निकटचे संबंध असल्याने मंत्री धनंजय मुडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे, येथील पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांना देण्यात आली होती.



Comments