जरांगे पाटलांनी केला ऑडिओ बॉम्बचा धमाका, राज्यातला भाजप शिंदे गट कामाला 32 मिनिटाच्या ऑडिओ बॉम्बने राज्यातला भाजप, शिंदे गट कामाला

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महाराष्ट्रामध्ये ऑडिओ बॉम्ब धमाका करत राज्यात खळबळ उडवून दिली. 32 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगेविंरोधात भाजपाचे लोक षडयंत्र रचताना स्पष्ट होत आहे. तसेच जरांगेंना मॅनेज करण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे. ते खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून जरांगेपर्यंत पोहोचवल्याचेही या ऑडीओ क्लिपमध्ये हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारी महिलेने बोलून दाखवले आहे. दुसर्या ऑडिओक्लिपमध्ये जरांगे पाटीलयांच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांच्या जवळची माणसं फोडण्याचा बोललं गेलं आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांनी ऑडिओक्लिप या विषयावर दिवसभर पत्रकार परिषदांचा सपाटा लावला. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ बॉम्बच्या धमाक्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जरांगे पाटीलांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर श्रीकांत शिंदे मार्फत मला 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज आहे. मला एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी दिले का? किंवा मला देण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी घेतले? याचं उत्तर द्यावं असा गंभीर आरोप करत इशारा दिला होता. त्यावर शिवसेना (शिंदे गट) दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत जरांगे पाटील यांची लायकी काढली होती. जरांगे पाटील यांनी काल माध्यमांसमोर बोलताना रामदास कदम यांच्यावर जोरदार पटलटवार करत उद्या पत्रकार परिषदेत पुरावे मांडण्याचा इशारा देत आपल्या विरोधात कसे षडयंत्र रचलं जात आहे त्याचे खुलासे करणार असल्याचे सांगितले होते.
जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत 500 कोटीरुपयांचे संभाषण करणारी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्याचबरोर आपल्या बोलण्यासाठी जवळची माणसं कशी फोडली, त्याचा पुरावाही एका ऑडिओक्लिपद्वारे जरांगे पाटलांनी मांडला. जरांगे पाटील म्हणाले, आमच्यासारख्या गरिबांच्या पोरांचे किती अवघड आहे, आमच्याविरोधात 3 वर्षापासून षडयंत्र सुरू आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोण कोण आहे याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, समाजाचे काम करू नये म्हणून आम्हाला मारून टाकतील.
500 कोटी दिले असं बोलले जाते. कुणी हे पैसे दिले आणि कुणाला दिले हे शोधले पाहिजे, ही माणसे कोण आहे ती राज्यात आरजकता माजवताहेत हे शोधले पाहिजे. हे विखारी लोक राज्यात अराजकता पसरवत असतील तर त्यांना काळ्या पाण्यापर्यंत पोहचवलं पोहिजे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
पत्रकार परिषदे कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर जरांगे यांनी ऐकवली. त्यानंतर ते म्हणाले की, मराठा समाजासाठी मी मरायला तयार आहे मराठ्यांविरोधात मराठ्यांचे पोरं बोलायला तयार आहेत. त्यांना सोबत घ्या. पैसे द्या. दोन्ही मराठे एकमेकांविरोधात बोलतील. जसे नाचवयाचे तसे नाचावा. मराठ्यांनी डोळे उघडा, सिंधुदुर्गात छत्रपतींचा पुतळा पडला, त्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या प्रकरण टाकायचे हे षडयंत्र रचलं. ऑडिओ हे ऐकायला मिळते. पक्षाचा फंड वापरुन आमच्या विरोधात बोलायला लावायचे. मराठ्यांच्या पोरांनी चुकीचे कामं करू नका. हा संपूर्ण विषय पायाखालची जमिन सरकवणारा आहे असंही ते म्हणाले. तसेच शिंदेचा कोण मंत्री काय बोलतो हे मला माहिती आहे. मुंबईतील पत्रकार भवन माझ्याविरोधात बोलण्यासाठी कसं उघडले जाते.
कोण कोणत्या जिल्ह्यात बोलते. तुम्ही कोणाशी व्हाट्सअॅपवर बोलता. तुम्ही ज्यांच्याशी माझ्याविरोधात बोलता, ते तुमचे आहेत असं तुम्हाला वाटते, पण मला सगळे माहिती आहे. शिंदेंनी सावध व्हावे, कोणाच्या क्लबमधून पैसे कुठे जातात हे मला माहिती आहे. शिंदेकडून 70 टक्के लोक माझ्याविरोधात बोलायला लावता. पुढच्या 1-2 महिन्यात मी यापेक्षा मोठा विषय बाहेर काढणार असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले मी सगळ्यांचा बाजार उठवतो, कुणी कुणाला 500 कोटी रुपये दिले हे सगळे माहिती आहे. शिंदेचा स्वाभिमान होता म्हणून डोक्यावर घेऊन नाचलो. पण माझ्याविरोधात कोण कुणाला काय पुरवतो, किती बळ देतो, कुणाला फोन जातात हे सुद्धा मला माहिती आहे. बीडसारख्या ठिकाणी मराठा पोरांवर 307 चे गुन्हे दाखल होतात. कोण बैठका लावतंय हे माहिती आहे. तुम्ही कुणाला बोलायला लावता हे माहिती आहे. शिंदेंनी साधव व्हावे. मी जर खोलात गेलो तर इतक्या भयंकर गोष्टी माझ्याकडे आहेत ते समोर आले तर रान पेटवल्याशिवाय राहणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.



Comments