top of page

सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास यांना जामिन मंजूर, 7 दिवसानंतर तिहार तुरुंगातून येणार बाहेर

2 hours ago
1 min read

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे पहिल्या फळीतले नेते अशुतोष रांका आणि सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या विशेष कोर्टाने बुधवारी त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळं आता 7 दिवसानंतर या दोघांचाही तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना कोर्टानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.


भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. पण आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानातूनच ताब्यात घेतलं होतं. तसंच दिल्लीत असलेल्या आणि दिल्लीकडं निघालेल्या इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आहे त्याच ठिकाणी ताब्यात घेतलं होतं. पण दिपके, रांका आणि दास यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि वर्षभर कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कुठलंही आंदोलन न करण्याच्या अटीवर सोडून दिलं होतं.

पण तरीही दुसार्‍या दिवशी रांका आणि दास हे पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर आणि जंतर-मंतरच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले आणि बॅरिकेट्सवर चढले, असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्टात हजर केलं. त्यानंतर कोर्टानं त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोठडी संपणार होती पण कोर्टानं त्यात आणखी दोन दिवसांनी वाढ केली. त्यामुळं एकूण 7 दिवस या दोघांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर आजही पोलिसांनी आणखी कोठडी मागितली होती, तर दुसरीकडे सीजेपीने जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर त्यांचा जामीन कोर्टान मंजूर केला आणि त्यांची सुटका झाली.


दरम्यान, सीजेपीनं स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या 19 ऑक्टोबरच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टानं सीजेपीच्या दोन्ही सरदस्यांना फटकारलं होतं, त्यानंतर काही त्रुटींमुळे त्यांनी आपला अर्जही मागे घेतला होता. एसएमई कोर्टानं दोन दिवसांच्या वाढवलेल्या कोठडीविरोधात दोघांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

Comments


bottom of page