top of page

शिंदे साहेब तुम्ही मला देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी घेतले? भाजप तुम्हाला संपवतय का?, तुम्ही मला संपवताय!; जरांगे पाटीलांच्या आरोपने राज्यात खळबळ

3 hours ago
3 min read

नारायगडावरील दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप


बीड: मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नारायणगडावर आज दसरा मेळावा संपन्न झाला. गडाचे मठाधिपती महंत शिवाजी बाबा महाराज,उत्तराधिकारी संभाजी बाबा महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. गडाच्या वतिने महंत शिवाजीबाब महाराज, संभाजी बाब महाराज यांनी जरांगे पाटील यांचा सन्मान केला. मला संपवन्याचे मोठे षडयंत्र रचले आहे, ज्यावमध्ये एक माजी मुख्यमंत्री असल्याचा धक्कादायक दावा करत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पाचशे कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीचा गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


श्री क्षेत्र नारायणगडावरील पारंपारीक दसरा मेळाव्यास मागील तीन वर्षापासून जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभत असल्याने राज्याचे लक्ष या मेळाव्याकडे होते. पहाटेपासूनच भक्तगणांसह जरांगे पाटील समर्थक गडावर दाखल झाले होते. दुपारी 12:00 वाजेच्या दरम्यान लाखोंच्या गर्दीस संबोधिस जरांगे पाटील यांनी संबोधित केले. खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयराजे पंडित, आमदार संदिप क्षिरसागर यांची भक्तगणांमध्ये उपस्थिती होती.


माझ्याकडे पुरावे आहेत मी पुराव्या शिवाय बोलत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या आरोपावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. मी कसली टीका टिपणी केली नाही, शिंदे साहेबांनी काय असेल ते सत्य सांगावं भाजपकडून माझ्या नावाने त्यांनी पैसे घेतले आहेत का? घेतले असतील तर मला दिले आहेत का? त्यांनी हा किंवा नाही काय ते सांगावं नाहीतर मी पुरावा द्यायला तयार आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा 500 कोटी रुपयसांच्या देवाण-घेवाणीबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी नारायगणडावरील दसरा मिळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत 500 कोटी रुपयांची देवाण घेवान झाल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीत भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल खोटं सांगितलं. कारण, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी पोहोचले आहेत, असं तुम्ही भाजपच्या नेत्यांना बोलले का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.


तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत शिंदेंनी उत्तर द्यावं, भाजप शिंदेंना साहेबांना संपवत आहे की शिंदे साहेब मला संपवत आहे हे समाजासमोर येणं महत्वाचं आहे. शिंदे साहेबांनी बोलावंं, त्यांच्या पोराचं नाव मध्ये आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या आरोपाचे आपण पुरावे द्यायला तयार आहे, असेही म्हटले. मला कच्चा समजता का, राज्यात काही पण होऊ शकतं. माझ्याकडल्या पुराव्यांमध्ये सगळं आहे. आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे साहेबांनी सांगावं, नसेल तर उद्या संध्याकाळपर्यंत सांगावं, असं आव्हान जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिल.


जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 500 कोटी रुपये दिले अशी भाजपमध्ये चर्चा आहे, त्यामध्ये दिल्लीचे आणि महाराष्ट्रातील भाजपचे लोक आहेत. त्यामुळे माझं विचारणं काम आहे,

शिंदे साहेब तुम्ही माझ्या नावाने भाजपकडून पैसे आणलेत का? मला उपोषणाच्या नवव्या दिवशी हे कळलं , ही काय साधी रक्कम नाही शेत तळ्यातच पुरावी लागली असती, माझ्या आयुष्यात मी पाच हजार रुपयाचा बंडल पाहिला नाही. तेवढे पैसे असते तर मी मराठ्यांची 40 हजार पोरं तरी कमीत कमी सुधारले असती असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुरावे देण्याची तयारी दर्शवली.


दुष्काळाचे भीषण संकट आहे, सरकारने शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अन्यथा आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. तीन महिने शांत राहायचं, मी कोणावरही टीका केली नाही. दिलेल्या अश्वासनाची पूर्तता करा तीन पैकी एक महिना लोटला आहे. उरलेल्या दोन महिन्याच्या कालावधीत 58 लाख नोंदीप्रमाणे दाखले वाटप करा. नोंदीनुसार दाखले वाटपासाह समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठा सेवक नियुक्त करण्यात येतील. मराठ्यांच्या मुला- मुलींनी आरक्षण भेटलं आहेत तर खूप अभ्यास करांवा अधिकारी व्हावं. ज्यांना कुणबी आहे त्यांनी कुणबी, ईडब्ल्यू एस, ईएसबीसी च्या आरक्षणाचा लाभ घेवून प्रशासनात नोकरी करावी. दुष्काळाच्या संकटाला तोंड द्यायचं कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका असे अवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

Comments


bottom of page