दसरा मेळाव्यांवर यंदा दुष्काळाचे सावट! श्री क्षेत्र नारायणगड, भगवान भक्तीगडासह मुंबईतील मेळाव्यांकडे लक्ष

बीड/ मुंबई: विचारांचं सोनं लूटण्यासाठी परंपरेनुसार यंदाही राज्यात उद्या दसरा मेळावे पार पडत आहेत. मागील वर्षी अती मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ, तर यंदा कोरड्या दुष्काळाचे भीषण सावट घोंगावत आहे. दुष्काळात रोजगाराच्या भ्रांतीमुळे यंदा बीड जिल्ह्यातून अधिक प्रमाणात ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे भीषण दुष्कळाच्या सावटामध्ये बीडमध्ये तीन दसरा मेळावे पार पडणार आहेत. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायगड येथे परंपरेनुसार यंदाही दसरा मेळावा संपन्न होत आहे. मागील दोन वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सहभागामुळे येथील मेळाव्याचे आकर्षन वाढले आहे. लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांनी प्रारंभ केलेला दसरा मेळावा परंपरेनुसार त्यांच्या वारस मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड सावरगाव (सुपा) येथे संपन्न होणार आहे.
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत शिवाजीपार्क येथे तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र मायंबा संस्थान , मच्छिंद्रनाथ गड सावरगावा घाट येथेही भाजप आमदार सुरेश धस यांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे.
हिंदू धर्मामध्ये साडे तीन महूर्ता पैकी म्हणून विजया दशमी (दशरा) ला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे. नाविन्यपूर्ण उद्योग, व्यवसायांसह खरेदीसाठी हा मुहूर्त शुभ मानतात. त्याचबरोबर आपटा वृक्षाची पानं सोनं स्वरुपात एकमेकांना देवून अलिंगन आणि गळा भेटीने विचाराचे सोनं लुटण्याची प्रथा कायम आहे. शस्त्रपुजन, शिलांगन, वाईट विचारांची होळी (रावनदहन) त्याचबरोबर विचारांचं सोनं लुटणार्या या पारंपारिक विजया दशमीला दशरा मेळाव्याचे वैभव प्राप्त आहे.
परंपरेनुसार यंदा श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील दोन वर्षापासून येथील दशरा मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित करत असल्याने नारायणगडावरील दशरा मेळावा अल्पावधीत आकर्षण ठरला आहे. जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी या मेळाव्यास राज्यभरातील गडाच्या भक्तांचा जनसागर उसळत आहे. यंदाच्या दशरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून गडावर मेळाव्यास येणार्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, नाष्टा, फराळ, जेवनावळीसह आरोग्यसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या वाहनांसाठी गडावरच पार्किंगची सोय करण्यात आली असून नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या चारही दिशांच्या गावखेड्यांमध्ये भाविकांच्या नाष्टा, फराळ, जेवळणावळींची सेवा करण्यात येणार आहे.
यंदा दुष्काळाचे भीषण सावट आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने भाविकांनी उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक साधनं जवळ बाळगावे, वाहनं चालवताना वाहतूक नियमांचं पालन करुन शिस्त पाळण्याचं अवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणारे अमोल खुने यांनी दसरा मेळाव्यास येणार असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले होते. याशिवाय बीडमधील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनीही जरांगे पाटील यांना नारायणगडावरील दशरा मेळाव्यातून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील नारायगडावरुन दशरा मेळाव्यातून काय अवाहन करतात याकडे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर परंपरेनुसार दिवंगत लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवानगडावर प्रारंभ केलेला दसरा मेळावा त्यांच्या वारस मंत्री पंकजा मुंडे यांनी ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा यांच्या जन्मस्थानी सावरगाव (सुपा) येथे भगवान भक्ती गड येथे दशरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही उद्या भगवान भक्ती गडावर भव्य दशरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी येणार्या भगवानभक्तांच्या सेवेसाठी गडाच्या मार्गावर जागोजाग पिण्याचे पाणी , चहा, नाष्टा, फराळ जेवनावळीची सोय करण्यात आली आहे.
यंदा दुष्काळामुळे अवास्तव संकटाला सामोरं जाणारा शेतकरी, पावसाअभावी हाता तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरवल्याने आर्थिक समस्यांशी संघर्ष करणार्या बळीराजाला आधार देण्यासाठी शासनाची भूमिका यावर मंत्री पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष लागल्याने भगवान भक्ती गडावरील दशरामेळाव्याची उत्सुकता आहे .
परंपरेनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळाव शिवाजी पार्क मैदान येथे संपन्न होत आहे. शिवसेनेच्या यंदाच्या दशरा मेळाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमुळे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ‘ संविधान रक्षणार्थ’ ही टॅगलाईन देत ठाकरे सेनेने यंदाच्या मेळाव्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. विशेष म्हणजे, या पोस्अरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आंदोलनातील आक्रमक फोटो झळकल्याने चर्चेला आणखी रंग चढला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रसिद्ध करण्यावत आले आहे. या पोस्टरमध्ये लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. पक्षाने दिलेल्या संदेशामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
‘ हुकूमशाहीला दणका देण्यासाठी, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी... चला, करुया एल्गार!’ असा संदेश या पोस्टरवर देण्यात आला आहे. ‘ यंदाचा दसरा मेळावा संविधान रक्षणार्थ’ ही टॅगलाईनही लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात संविधान, लोकशाही आणि सत्ताधार्यांविरोधातील राजकीय भूमिका यांवर ठाकरे सेना भर देणार आहे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे होत आहे. शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता दुष्काळच्या पार्श्वभूमिवर राज्याच्या कानाकोपर्यातील गावखेड्यातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यातून काय बोलणार? याची उत्सुकता लागली आहे. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येणार असल्याची शक्यता गृहीत धरुन तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे यांनी दुरच्या जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी मुंबईत येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळाची भीषणा अधिक असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्या भागातील शिवसैनिकांनी मेळाव्यासाठी मुंबईत येऊ नये असे अवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र मायंबा संस्थान, मच्छिंद्रनाथ गड येथे भाजप आमदार सुरेश धस यांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. नाथ भक्तांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार धस यांनी केले आहे.



Comments