अमोल खुणेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप सगळं माहिती आहे दोन दिवसात बोलतो ; कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार, अब्रूनुकसाणीचा दावा दाखल करणार !
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 2 min read

अंबड: आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची सुपारी देवून घातपाताचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि शिष्टमंडळाच्या तक्रारीवरुन जरांगे पाटील यांचे जुने सहाकारी अमोल खुणे, दादा गरड यांना जालना पोलिसांनी अटक केली. नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यासह शिष्टमंडळावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची दोन कोटी रुपयांना सुपारी देवून घातपाताचा आरोप करण्यात आला होता. आमदार धनंजय मुंडे यांच्याशी डिल केल्याच्या कथित ऑडिओक्लिप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप आणि जरांगे पाटीलयांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीनुसार जरांगे पाटलांचे जुने सहकारी अमोल खुणे, दादा गरड यांच्यासह बीडमधील एकास जालना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जरांगे पाटील यांची सुपारी देवून हत्येचा कट रचल्या प्रकरणाच्या आरोपामध्ये अमोल खुणे, दादा गरड व अन्य एकाची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
काल जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत घातपाताच्या कटाची एसआयटी चौेकशी, नार्कोटेस्टची मागणी करत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आता नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अमोल खुणे यांनी माध्यमांशी संवाद साधत जरांगे पाटील यांच्यासह शिष्टमंडळावर गंभीर आरोप करत “ मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. मला सगळं माहिती होतं म्हणून मला यामध्ये गुतवलं, केस निल झाल्यावर मी जरांगे पाटील यांच्यासह शिष्टमंडळावर अब्रूनुकसाणीचा दावा दाखल करण्याचा इशारा देत माझ्यासह जरांगे पाटीलयांची नार्कोटेस्ट, एसआयटी चौकशी करा ” अशी मागणी केली आहे.
अमोल खुणे म्हणाले की, मी समाजासाठी काय नाही केलं, सन 2000 मध्ये मी माझ्या गावातून बैलगाडी ओढत मुंबईला नेली. त्यावेळेस माझ्या पायात चप्पलही नव्हती बैलाशिवाय मी स्वत: गाडी ओढली. कोपर्डी प्रकरणात जरांगे पाटील यांनी आम्हाला फसवलं आरोपींना न्यायालयात मारहाण करायचं सांगितलं होतं. असं नाही केलं तर मी फाशी घेईल असं खुणे म्हणाले. कोपर्डी प्रकरणात मला 5 पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे, मी वीस महिने सजा भोगून आलोय जरांगे पाटील नाही. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्याच्या बाजून बाइट दिल्या. मला सगळंच माहिती आहे.
येत्या दोन दिवसात सविस्तर बोलेन. कोणी कुठू किती गबाळ घेतलं हे मला सगळच माहिती आहे.त्यामुळंच मला यातध्ये आडकवलंय. माझ्यावर सुपारीचा आरोप केला होता. याबद्दल मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. दादा गरुडने ज्या रेकॉर्डिंग त्यांच्याकडं दिल्यात त्या सुद्धा व्हायरल करा त्यात कुठं तुमच्या सुपारीचा विषय आहे. त्यांच्याच पुराव्या विषयी दादा गरड मला बोलत होता, आणि मला ते करायचं नव्हतं. दादा गरड म्हणाला मला तुझ्याकडल्या रेकॉर्डिंग दे मी तुला पैसे देतो असं म्हणत होता. सीडीआरमध्ये धनंजय मुंडे आणि माझा कसलाच संबंध नाही आला. माझ्यावर जे आरोप लावले त्याचं काय ते एसआयटी आणि नार्कोटेस्टमध्ये सिद्ध होइलच.
कोर्टाने निरिक्षण नोंदवलं चार्जशिटमध्ये काहीच अढळलं नाही, प्रत्यक्ष कोर्ट म्हणालं की या केस मध्ये काही ढेकळं नाही.
मला माफीनामा घेण्यासाठी दबाव आणायचा बैठक घ्यायची आणि दादा गरड तिथून फोन करतोय धनंजय मुंडेला फोन करतोय म्हणजे ठरवून कार्यक्रम आहे का? सीडीआरमध्ये धनंजय मुंडे सोबत काही असलंतर काढा ना ते विनाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं, आत्तापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं. माझ्य नांव कशामुळे बदनाम करायचं. त्यांच्यासह शिष्टमंडळाचं मला माहिती झालं म्हणून मला यात गुंतवून माझं विनाकारण यात नाव बदनाम केलं. माझी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्या महाराष्ट्रात.
मला सगळंच माहिती आहे, लइ मोठं काढणार आहे , मी दोन दिवसात बोलतो माध्यमांशी. जरांगेसह ज्यांनी मला छळलं आहे त्यांच्यावर मी आब्रूनुकसानीचा दावा टाकणार आहे. नार्कोटेस्टला दोन दिवसाची मुदत दिली आहे. मी तर सगळ्या चौकश्यासह नार्कोटेस्टला तयार आहे आता जरांगे पाटलांनीही सामोरं जावं. त्यामुळे यातील सत्य बाहेर येण्यासाठी एसआयटी, सीआयडी, नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणीही अमोल खुणे यांनी माध्यमांशी बोलताना केली.



Comments