सर्व मंत्री-आमदर दिसणार बांधावर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना; मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत

मुंबई: राज्यात गेल्या दिड महिण्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन पीक करपून गेले आहे. मराठवाड्याती शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर, विविध शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमिवर आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली.
शेतकर्यांच्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्यासाठी फिल्डवरून माहिती गोळा केली जाईल. बहूतांश भागात पीकं करपली आहेत. सोयाबीन आणि कापूस पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोकरणात भातावर परिणाम झाला आहे. असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. विशेष करून पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा यावर लक्ष द्यायचं ठरलं आहे. महापालिका, नगरपालिका आणि पंचायत राज संस्थां यांच्याकडे पिण्याच्या पाण्यासंदर्भातील निर्णय दिले आहेत. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पकंजा मुंडे, बाबासाहेब पाटील अन्य मंत्री असतील, समितीचे सचिव हे मुख्य सचिव असतील, समितीचे सचिव हे मुख्य सचिव असतील, दुष्काळ संदर्भात अपडेट या समितीकडे दिले जातील, या उपसमितीला अधिकार दिले आहेत. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मी ही उद्या दौरा करणार आहेत. सर्व मंत्री आणि आमदार बांधावर जातील एनडीआरएफचे काही नियम आहेत, त्यानुसार प्रक्रिया सुरू राहिल. मात्र, वाट पाहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसिमती स्थापन करण्यात आली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील हे सदस्य असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे देखील उपसमितीचे सदस्य सचिव असतील.
मुख्यमंत्री शेतकर्यांना मदत करत नाहीत- सपकाळ : गणपती उत्सव सुरू आहे. दुष्काळ संकट आहे. एसआयआर साठी मुदतवाढ द्यावी अशी आमची मागणी होती, ती देण्यात आली नाही. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जातो. त्यामध्ये लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद केली जाते. आता, लोकसंख्या आकडा कमी झाला आहे. आपोआप आता आर्थिक तरतूद देखील कमी होईल. एसआयआर मुळे मतदार कमी करत आहे. महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस एकीकउे शेतकरी संकटात आहेत, त्यांना मदत करत नाहीत दुसरीकउे मतदार देखील कमी केले जात आहेत, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका केली.



Comments