जरांगे पाटीलांचे सहकारी आयकर विभागाच्या रडारवर?

जालना: आंदोलनाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून राज्य सरकारकडून कोट्यावधींचे कंत्राटे घेण्याचे काम जरांगे पाटील यांच्या सहकार्यांकडून झाले आहे, असा अरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी आयकर खात्याच्या रडावर आले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकार्यांची आयकर विभाग चौकशी करणारअसल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी विक्रमी अकराव्यांदा 20 दिवसांचे आमरण उपोषण केले. मात्र या आंदोलनाच्या नावाखाली त्यांच्या सहकार्यांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप अजय बारस्कर महाराज यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर जरांगे पाटील यांच्या अवती भोवती असलेल्या सहकार्यांची चौकशी करण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी झटत असल्याचे समाजाला दाखवत आहेत. मात्र समाज हिताचा कोणताही लढा नसून वैयक्तिक स्वार्थासाठी जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी काम करीत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून राज्य सरकारकडून कोट्यवधींचे कंत्राटे घेण्याचे काम जरांगे पाटील यांच्या सहकार्यांकडून झाले आहे, असा गंभीर आरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरणकर, पांडुरंग तारक आणि किशोर बलांडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. यामध्ये त्यांच्या एका सहाकार्याने 764 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवल्याचा अरोप बारस्कर यांनी केला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या सहकार्यांवी आयकर विभागाकडून होणार्या चौकशीकडे लक्ष लागले आहे.
जरांगे पाटील यांच्या सहकार्यांचे आयकर रिटर्न, मालमत्ता, मोठे आर्थिक व्यवहारप आणि व्यावसायिक संबंध तपासले जात असल्याची माहिती आहे. आंदोलनाशी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांशी जोडलेल्या कंपन्यांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांचाही आता तपास होऊ शकतो , अशी माहिती आहे. यामध्ये कंत्राटातील बोली प्रक्रिया, मालमत्तेतील वाढ, आणि संबंधित व्यवहारांची झालेली प्रक्रियेचा समावेश आहे.
जरांगे पाटील यांच्या सहकार्यांचे जमीन व्यवहार, मालमत्ता आणि निधीच्या स्त्रोताचीही चौकशी सुरू असल्याचे समजते, मराठा आरक्षण आंदोलने होत असताना जरांगे पाटील यांच्या मागेपुढे असणारे सहकारीच आता चौकशीच्या — फेर्यात येणार असल्याने हा जरांगे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.



Comments