शेतकर्यांनी पिके न नांगरता पंचनाम्याची वाट पाहावी- ना. जयकुमार गोरे

सोलापूर : आपल्याकडे परतीचा मान्सुम येतो, त्यामुळे आपल्याला 5 ऑक्टोबर पर्यंत दुष्काळ जाहीर करताच येत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आपली पिके न नांगरता पंचनाम्यासाठी वाट पाहिली पाहिजे, असं विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. सोलापुरात आज (दि.21) पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी हे विधान केले.
पालकमंत्री गोरे म्हणाले की, दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष असतात. पाच ऑक्टोबर ही केंद्र सरकारची परतीचा मान्सुम संपण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर दुष्काळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. त्यावर सरकार पूर्वतयारी करत आहे. जोपर्यंत पावसाच्या तारखा आहेत, तोपर्यंत आपल्याला पावसाची वाट पाहावी लागेल. त्यानंतरच दुष्काळी उपाययोजना करण्यात येतील.
कधी कधी एकाच दिवशी प्रचंड पाऊस पडातो, पण सध्या तशी परिस्थिती नाही. आपण सध्या प्रचंड संकटात आहोत. सर्व निकष पूर्ण करून आपले प्रस्ताव वेळेत सरकारकडे पाठविण्यासाठी आजची बैठक होती, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांनी अपली पिके नांगरून न टाकता थांबलं पाहिजे. आपल्याला पंचनामे करेपर्यंत थांबलं पाहिजे, पण अधिकार्यांनी पिकांची माहिती घेतलेली आहे. काही पिकांना पाऊस पडूनही फायदा होणार नाही. काही पिकांना पाऊस पडला तर उभारी येऊ शकते. थोडीशी पिकं सुस्थितीत आहेत, ती बाहेरही पडू शकतात . कायद्याने सगळ्यांचे हात बांधलेले आहेत. सरकार म्हणून निर्णय जाहीर केला. तर ते तसे होत नाही, त्यामुळे शेतकर्यांनी आपली पिके न नांगरता पंचनाम्यासाठी वाट पाहिली पाहीजे असं अवाहन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.



Comments