top of page

दोन हजार एकरावर ‘नवीन नागपूर’ उभारणार- मुख्यमंत्री फडणवीस

2 hours ago
2 min read

नागपूर : पायभूत सुविधांच्या अभूतपूर्व जाळ्यामुळे नारगपूर शहर आता केवळ महाराष्ट्राचे उपराजधानीशहर राहिलेले नाही, तर ते एक आधुनिक, आंतरराष्ट्रीय आणि शाश्वत दर्जाचे शहर म्हणून वेगाने उदयाला येत आहे. भविष्यातील शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन सुमारे 2000 एकर क्षेत्रात रोजगार केंद्रित असे ‘ नविन नागपूर’ विकसित करण्याचे महत्वकांक्षी नियोजन राज्य सरकारकडून हाती घेण्यात आले आहे. नागपूरच्या दौर्‍यावर आणि विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यसांनी सर्वसमावेशक भविष्यातील आराखड्यावर विशेष भर दिला.


शहराच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरला सुव्यवस्थित स्वरुप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणार्‍या आणि उत्तर, मध्य आणि दक्षिण नागपूरला अधिक सक्षमपणे जोडणार्‍या 8.90 किलोमिटर लांबीच्या आणि सुमारे 998 कोटी रुपये लागत असलेल्या ‘ इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे ’ (डॉ केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल) डिजिटल लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या विकासोत्सवाच्या पार्श्वभूमिवर नागपूरच्या संभाव्य विकासाचे चित्र अधिक स्पष्ट झाले.


पुढे बोलाताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूरकडे आज जागतिक स्तरावर एक प्रगतशील आणि अत्याधुनिक शहर म्हणून पाहिले जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखत कचर्‍यापासून उर्जानिर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प, सिमेंट काँक्रीटच्या दर्जेदार रसत्यामुळे खड्ड्यांपासून मिळालेली मुक्ती आणि शहराभोवती उभारले जाणारे बाह्य रिंगरोड यांसारखे प्रकल्प या दिशेने टाकलेली भक्कम पावले आहेत. भविष्यातील शहराचा विस्तार लक्षात घेऊन आणखी एक नवीन रिंगरोड तयार केला जाणार असून, याद्वारे नागपूरला टॅ्रफिकमुक्त व प्रदूषणमुक्त ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. याच मालिकेतील सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे सुमारे 2000 एकर क्षेत्रात उभारले जाणार ‘ नवीन नागपूर’ जे पूर्णपणे रोजगार केंद्रित असेल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


नागपूर शहरात आगामी काळात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन मोठे विकासप्रकल्प राबविले जाणार असून शहरासाठी आगामी काळात 1 हजार कोटींची तरतूद उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. दिक्षाभूमी विकासाचा आराखडा देखील मंजूर झाल्याचं पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

Comments


bottom of page