top of page

जरांगे पाटलांचे उपमुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप, आरोपांची चौकशी करून तुमचे स्वप्न पूर्ण करून घ्या - जरांगे पाटील रुग्णालयातून मोडीलिपी, फारशीच्या अभ्यासकांना अवाहन

59 minutes ago
2 min read

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेलाव वेग देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठं आवाहन केलं आहे. मोडी लिपिचे अभ्यासक आसलेल्या जाणकारांनी, मोडी लिपी वाचता येणार्‍यांनी तसेच फारसीच्या अभ्यासकांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावं, असं अवाहन करत जरांगे पाटील यांनी त्यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर होणार्‍या आरोपांचे खंडन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टिकास्त्र सोडले.


पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोडीलिपी आणि फारसी भाषेच्या अभ्यासकांना येत्या काही दिवसांत रुग्णालयात येण्याचं अवाहन केलं आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारच्यसा समितीसोबत काम करण्यासाठी या अभ्यासकांची मदत घेतली जाणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले “ मोडीलिपी अभ्यासकांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला यावे, उद्यापासून रविवारपर्यंत सर्वांनी रुग्णालयात यायचे आहे. फोनची वाट पाहू नका. आम्हाला मोडीलिपीचे अभ्यासक कोण आहेत हे माहित नाही. त्यामुळे तुम्ही 27 सप्टेंबरच्या आता रुग्णालयात येऊन भेटा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिथे जिथे मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी उद्या परवा, शनिवारी, रविवार या पाच सहा दिवसात येऊन मला भेटा. बुधवारपासून रविवारपर्यंत कधीही या. तुम्ही तुमचे योगदान द्या आपल्याला आपल्या लेकरांसाठी काम करायचे आहे.”


कुणबी नोंद शोधण्यासाठी मोडी लिपीचं ज्ञान असलेल्या व्यक्तींची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नोंदी वाचणे, त्यांचा अभ्यास करणे आणि उपलब्ध कागदपत्रांमधील नोंदी जुळवणे यासाठी अभ्यासकांनी पुढे यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. मोडीलिपी च्या अभ्यासकांबरोबरच फारसीच्या अभ्यासकांनीही रुग्णालयात येण्याचं आवाहन केलं आहे. “ मोडी लिपीच नव्हे फारशीच्या अभ्यासकांनीही रुग्णालयात यायचे आहे. तुमच्या नशिबाने तुम्हाला सेवा करण्याची संधी आली आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाईल. आपल्यवाला जुना रेकॉर्ड शोधायचा आहे. हैदराबाद संस्थानातील जुने बाड शोधायचे आहेत. ही सर्व‘ लिखापढी फारसी आणि मोडीलिपीत आहेत. त्यामुळे या भाषावंच्या जाणकारांनी, अभ्यासकांनी येऊन मला भेटावे. मी तुमची नावे सरकारला देणार आहे. तुम्हाला वंशावळ जुळवणे, फाशी आणि मोडीलिपीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास असणार्‍यांनीच या इतरांनी गर्दी करू नका. तुमचे नांव आणि पत्ता घेवून मला लवकर सरपकारला कळवता येणार आहे”


जुन्या कावगदत्रांमध्ये आणि विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्यसा नोंदीमधून पुरावे शोधण्याची गरज असल्याचंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. हैदराबादच्या गॅझेटपासून विविध जुन्या रेकॉर्डपर्यंत शोध घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे म्हणाले, ज्यांना मोडीलिपी वाचता येते त्यांनीही यावे. तुम्हाला हैद्राबादच्या गॅझेटपासून सर्व शोधायचे आहे. तुम्हाला रेकॉर्ड शोधण्यासाठी योगदान देता येईल. ज्या ठिकाणी व्यापार होत, जनावरांचे व्यापार होते, ते पुरावे शोधता येणार आहेत. तुरुंगात आणि रुग्णालयात जाऊनही पुरावे शोधता येईल. संभाजीनगरात पुराभिलेख विभागात जाऊन तुम्हाला पुरावे शोधता येणार आहे. पूर्वी देवीची लस दिली जायची, त्याचेही पुरावे शोधावे लागतील,ब्रिटीश कालीन आणि निजामकालिन पुरावे शोधावे लागणार आहे. ग्रंथालयात जाऊनही जुम्हाला पुरावे शोधवे लागणार आहेत. दिल्लीपर्यऐत तुम्हाला पुरावे शोध्यासाठी जावे लागणार असल्यवाचे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.


जरांगे पाटील यांच्या सहकार्‍यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. याबाबत मनोज जरांगे म्हणाले की, आरोपांची होऊ द्या चौकशी , सगळे सामोरे जायला तयार आहेत. तुमच्याशी मैत्री करून आरक्षण सोडायला आम्ही दोन बापाची औलाद नाही. आंदोलनाच्या काळात आंदोलकांच्यसा चौकशा होणार, श्रीमंतांना गरीब मराठ्यांना साथद द्यायची नाही का? आज तुमच्या हातात सत्ता आहे. शिंदेचे आमदार आमच्या चौकशी लावतात का? शिंदेंना सांगा, मराठा आंदोलकांची चौकशी करून तुमचे स्वप्न पूर्ण करून घ्या. निवडून मरठ्यांकडून आले आणि त्यांचीच चौकशी करीत आहेत. तुमची सत्ता पण कधी तरी जाणार आहे.


संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये इसार दिला, एका दैनिकाच्या कार्यालयात जाऊन बसले. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? किती मराठ्यांचे आंदोलक गुंतविल्यावर शिंदेंचे पोट भरणार आहे? त्यांचे मित्र झालो नाही म्हणून त्यांच्याकडून हा त्रास आहे. राजकीय मराठा हा मराठा आंदोलकांच्या मागे लागला आहे. गरीब मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी पाडा म्हटलं त्या दिवशी तुटून पडा,असंही जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page