मुंबईतील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू !
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read
श्वसननलिकेत हाड अडकलं; वेळेत उपचाराअभावी मृत्यू?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्याने आणि प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयस्पद मृत्यू झालेला आहे. भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात शक्ती वाघ 2020 छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आला होता. त्यावेळी हा वाध साडेतीन वर्षाचा होता आणि आता तो दहा वर्षाचा होता. या वाघाचा मृत्यू झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस लपवली असल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून योग्य ती देखभाल झाली नसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणार्या पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न करणे या मागचं नेमकं कारण काय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे, मात्र त्यावर उपचार का केले नाही? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे, उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. प्राणी संग्रहालय प्राधिकरणच्या येथील अधिकर्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, वाघाच्या मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी म्हटलं की, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून शक्ती वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला आहे. प्राणीसंग्रहालय प्रशासन व त्याच्यावरतील उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हालगर्जीपणा झाल्याने हा मृत्यू झाला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिद्ध न करणे, त्याची माहिती न देणे, यामागचं नेमकं काय कारण आहे, हे सर्व लपवून का ठेवण्यात आलं, त्यामागे काय कारण होतं? व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाला तर वनविभाग त्याची बातमी दुसर्या दिवशी जाहीर करते पण वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस उलटूनही याची बातमी जाहीर न करणे यामगचं कारण काय आहे, या वाघज्ञचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वासनलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे.
पण त्याच्यावरती उपचार का केले गेले नाहीत? त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट लपवून ठेवण्यामागचं कारण आहे .याच्यामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर त्याचा शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, याचं काय कारण आहे, असा सवालही व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी उपस्थित केला आहे. शिवाय प्राणीसंग्रहालय प्रशासन असं म्हणत आहे की, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त यांची परवानगी नसल्याने आम्ही ते वृत्त प्रसिद्ध केलं नाही. मग आयुक्तांनी याबाबत मंजुरी का दिली नाही, माझी राज्याचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडे मागणी आहे की, याची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी केली आहे.
भायखळा राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी दावा केला आहे की, शक्ती वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्या झालेला आहे. एवढचं नाही तर ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती ही कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला देणे आवश्यक होते. मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्या आलेली होती.
किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केले प्रश्न: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी देखील शक्ती वाघाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या की, मृत्यू झाल्यानंतर लगेच सांगायला हवं होतं. लहान मुल तिथे वाघ बघायला येत असतात. वाघाला खाताना त्याला कुठे ईजा झाली असावी, म्हणून अटॅक आला असेल. कारण त्याला कुठलेही लक्षणे नव्हते त्याच्यासोबतची वाघीण हिरमूसली आहे, तिच्या मेंदू वर परिणाम होऊ शकतो. याचे अधिकृत कारण समोर आल्यानंतर बोलेल असंही त्या म्हणाल्या.



Comments