top of page

दुर्मिळ शृंगी घुबडास मिळाले माजी न्यायमूर्तीचे पालकत्व! सर्पराज्ञी प्रकल्पास अचनक सहकुटुंब भेट, निसर्ग संवर्धनाच्या कार्यावर समाधान

बीड: तंत्रज्ञाणाच्या युगामध्ये यंत्रा, तंत्राला देवत्व बहाल करणार्‍या मानव जातीस नैसर्गीक साधन, संपत्तीचा विसर पडत चालला आहे. निसर्गापुढे माणुस पालापाचोळा आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण, संवर्धन हीच खरी मानवता, ती टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणार्‍या सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्या कार्याने प्रभावीत होवून माजी न्यायमूर्ती डी. के सोनवणे यांनी आज प्रकल्पातील दुर्मिळ शृंगी घुबडाचे पालकत्व घेवून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.


मुंबई येथील माजी न्यायमूर्ती डी.के. सोनवणे यांनी सहकुटुंब बीड(तागडगांवर , ता. शिरुर कासार) मधील सर्पराज्ञी प्रकल्पास आज अचानाक भेट दिली. येथील वन्यजीव संवर्धन कार्याची प्रत्यक्ष पाहणी करत असताना जखमी, आजारी तसेच आईपासून दुरावलेल्या वन्यजीवांवर सुरू असलेली सेवा-सुश्रुषा, उपचार व पुनर्वसनाची सेवा पाहून समाधान व्यक्त केले.


सर्पराश्री प्रकल्पात सध्या उपचार सुरू असलेल्या दुर्मिळ शृंगी घुबडाचे पालकत्व स्वीकारून त्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी निस्वार्थ योगदान दिले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जखमी घुबडाच्या उपचार व संगोपनासाठी आवश्यक खर्चाला मोठा आधार मिळणार आहे.


सर्पराज्ञी प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी माजी न्यायमूर्ती सोनवणे यांचे आभार मानत त्यांच्या सहकार्यामुळे वन्यजीव संरक्षण चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments


bottom of page