महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट , 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
- Navnath Yewale
- 3h
- 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानत काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमान वाढ होताना दिसत आहे. वातावरण गरमी जाणवत असताना अता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकून 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस ?
हवामान विभागने 23 व 24 फेब्रूवारी अशा दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा. विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्यासरी पहायला मिळाल्या आता 24 फेब्रूवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येत असलेल्या आर्द्रतेमुळे तसेच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे पावसाचे ढग तयार होत आहेत. यातूनच पाऊस बरसतो आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रबी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणी चालू आहे, असे असताना अवकाळी पाऊस आल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच हवामानाचा अंदाज घेऊन शेतकर्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.
पावसाची ही शक्यता लक्षात घेऊन शेतकर्यांनी पिकांची कापणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. कापलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. या अवकाळी पावसामुळे आता इतर दैनंदिन कामांतही अडथळा निर्माण होऊ शकतो.



Comments