वाळू माफियांचे आड्डे उद्ध्वस्त करणार, लवकरच मोठी कारवाई- मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
- Navnath Yewale
- 18 hours ago
- 2 min read

नागपूर: भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू माफिया सबंधित पुरावे दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी वाहफ रॅकेट पूर्णपणे उद्धवस्त करण्याचे अश्वासन दिले.पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे सादर केले. डॉ. पडोळे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, ब्रम्हपुरी तहसीलमधील बोंडेगाव परिसरात वाळू भरणार्या हजारो वाहनांना 25 किलोमिटर अंतरावर असलेल्या हलदा जागेची रॉयल्टी दाखवण्यात आली. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. या संपूर्ण प्रकरणात ब्रम्हापुरी तहसीलदार सतीश मासाळ आणि कंत्राटदार सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय या आरोपाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
खासदार पडोळे म्हणाले की, चंद्रपुर जिल्हा दंडाधिकार्यांना ईमेल आणि स्वाक्षरी केलेले पत्र पाठवण्यात आले होते. परंतु वारंवार आठवण करून देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ब्रम्हपुरी तहसीलदारांची कारवाईबाबत उदासीन भूमिका राहिली. तहसीलदारांना तात्काळ निलंबित करण्याची, संबंधित सर्व अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली.
सन 2015 मध्ये देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वाळू वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली लागू केली. असे असूनही, ओव्हरलोडिंग आणि बेकायदेशीर वाहू वाहतूकीमुळे रस्ते अपघातात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाले आहेत. आरटीओ कारवाईपासून बचाव करण्यासाठी पोलिस पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ग्राहकांनी डोपोमध्ये ऑनलाइन वाळू शुल्क भरुनही प्रति ब्रास 2500 रुपये आणि प्रति वाहन 25000 ते 30,000 रुपये रोख रक्कम उघडपणे वसूल केली जात असल्याचेही खासदार पडोळे म्हणाले. यामुळे वाळू माफियांना हिंमत मिळाली आहे. जिल्हा दंडाधिकारी,महसूल कार्यालय आणि तहसीलदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. वाळू भरण्यापासून ते उतरवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया महाखनिजमान्य माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. जेणेकरून पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि वाळू सिंडिकेट आणि माफिया राजवट संपुष्टात येईल.
दरम्यान, महसुलमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये वाळू डेपो बंद करण्यात आले आहेत, परंतु गोंदिया जिल्ह्यात सर्व डेपो सर्रासपणे सुरू आहेत. येथे रॉयल्टीशिवाय थेट नदीतून अवैध वाळू उपसा केला जात आहे. रॉयल्टीशिवाय वाळू वाहने चालवल्याने 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषयावरही कडक कारवाई करण्याची मागणी खासदार पडोळे यांनी केली.
शनिवारी, भंडारा-गोंदिया येथील काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे विधानभवन संकुलात माध्यमांशी बोलत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना मरहाण करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यासोबतच्या भेटीनंतर पडोळे माध्यमांशी बोलत असताना तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना थांबवण्याचा आणि त्यांचा हात धरून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला.



Comments