हिंगोली पुन्हा भूकंपाने हारलं; औढा तालुक्यात भूकंपाचे धक्के!
- Navnath Yewale
- Dec 10, 2025
- 1 min read

हिंगोली: हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला आहे. काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्याला भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आज बुधवारी हिंगोलीतील औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. भूकंपाच्या धक्याने गावकर्यांमध्ये भीती पसरली आहे.
हिंगोलीच्या वसमतमध्ये 3 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 49 मिनिटांनी भूूकंपाचे धक्के जाणवले होते. पांगरा शिंदे आणि परिसरला भूकंपाचे धक्के बसले. या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाने हिंगोलीकरांची झोप उडवली.
या गावांना बसले भुकंपाचे धक्के: हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील दहा गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे. यामध्ये पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, पांगरा, आमदरी, जलाल धाबा, फुलदाबाद, कंजारा आदींसह परिसरातील दहा गावांना भूकंपाचा धक्का जाणावला.
भूकंपाचा हादर्याने झोपलेले नागरिक घराच्या बाहेर येऊन थांबले. भूकपांच्या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे असे आवाहन हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतिने करण्यात आलं आहे. तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील भूकंपाचे धक्के जाणवलेल्या गावातील नागरिकांची स्थानिक महसूल प्रशासनामार्फत माहिती घेतली आहे.



Comments