‘गोकुळ’ निवडणुकीचा निकाल जाहीर: तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड; सतेज (बंटी) पाटलांचं गोकुळवर निर्विवाद वर्चस्व

कोल्हापूर : सतेज (बंटी) पाटील यांनी दोन महिन्यांपासून महायुतीच्या रणनीतीविरोधात एकहाती प्रचार आणि प्रचाराची सूत्रे आपल्या हाती ठेवताना महायुतीला धोबीपछाड देत 25 पैकी 14 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व पप्रस्थापित केले.
कोल्हापूर जिल्ह्यामधील तब्बल तीन कॅबिनेट मंत्री, दहा आमदार आणि दोन खासदार आशी महायुतीमधील मातब्बरांची फौज असताना आणि सोबत डबल इंजिन सरकार असताना या सर्वांना पुरून उरत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी काँग्रेस प्रणित आघाडीने गोकुळच्या निवडणुकीमध्ये धोबीपछाड देत 25 पैकी 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले.
महायुतीकडून गोकुळच्या मतदारांना विविध पातळ्यांवर धमकावण्याचा प्रयत्न झाला होता. इतकेच नव्हे तर त्यांना तीन-तीन शपथा घ्यायला लावणारा प्रकार झाला होता. त्यामुळे महायुतीकडून प्रचंड अशी अजस्त्र यंत्रणा असताना सुद्धा अशा पद्धतीने धमकावले जात असल्याने कोल्हापूर दुध उत्पादकांमध्ये सुद्धा याची रंगली होती. या सर्वांना आता मतदानातून धडा मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये दोन माजी चेअरमन सुद्धा पराभूत झाले आहेत. विद्यमान संचालिका शौमिका महाडीक यांना सुद्धा पराभव पत्कारावा लागला.
दरम्यान, अरुण डोंबळे आणि विश्वास आबाजी पाटील यांची गेल्या तीन दशकांपासून गोकुळमध्ये जी मक्तेदारी होती ती सुद्धा मोडित काढण्याचं काम मतदरांनी केलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. आणि या दोघांकडे सर्वाधिक ठराव असल्यानेया निवडणुकीवर विपरीत परिणाम होतो का? याची सुद्धा चर्चा निवडणुकीमध्ये रंगली होती. मात्र, या दोघांचाच पराभव झाल्याने एक प्रकारे त्यांच्या ठराव धारकांमध्येच यांच्याबद्दल नाराजी होती. हे आता स्पष्ट झालं आहे. महायुतीच्या पॅनलचं नेतृत्व पूर्णपणे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि विद्यमान गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांना सुद्धा पराभवाचा दणका बसला.
गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळची निवडणूक विविध अंगांनी रंगली होती. त्यामुळे गोकुळची चर्चा कधी नव्हे ती फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नाहीतर अवघ्या राज्यामध्ये चर्चेचा विषय झाला होता. महायुतीकडून सातत्याने विजयाचे दावे केले जात होते. इतकेच नव्हे तर विजयाची फक्त औपचारिकता राहिली आहे असाही दावा केला जात होता. निवडणूक बिनविरोध करण्याची आवई महायुतीकडून उठवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, निवडणुकीच्या मैदानात सतेज पाटील यांनी निर्वीवाद वर्चस्व प्राप्त करत विजय खेचून आणला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या गोकुळची निवडणूक ही राज्यामधील चर्चेचा विषय बनली होती. गोकुळच्या निवडणुकीमध्ये 5418 पात्र मतदार होते. मात्र त्यापूर्वी संस्था पात्र अपात्र वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीला कधी नव्हे ते राजकीय रंग प्राप्त झाला होता. आजपर्यंत गोकुळ निवडणुक या पक्षीय पातळीवर लढवल्या जात नव्हत्या, तर त्या स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढवल्या जात होत्या. मात्र राज्यामध्ये सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर पहिल्यांदाच गोकुळमध्ये पक्षीय राजकारण घुसलं होतं. त्यामुळे गोकुळमध्ये सामान्य दूध उत्पादक राहिला बाजूला आणि लढाई नेत्यांमध्ये सुरू झाली होती. या सर्व पार्श्वभूमिवर गोकुळचा जो मतदार आहे तो कोणाला साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
गोकुमधील विजयी उमेदवार: अभिजीत प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील), शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील), राहुल पांडुरंग पाटील (महायुती), चेतन अरुण नरके (महायुती), अजित शशिकांत नरके (महायुती), किसन बापूसाहेब चौगुले (सतेज पाटील), अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती), बाबासाहेब श्रीपती चौगुले (सतेज पाटील), राहुल बंजरंग देसाई(सतेज पाटील), विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील), विरेंद्र संजय मंडलिक (महायुती), बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील), राजेश नरसिंगराव पाटील (महायुती) रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती), रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती), अजित पांडुरंग पाटील (महायुती), अमर पाटील (महायुती), विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील), विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील), युवराज दत्ताजीरावा पाटील (महायुती)
महिला राखीव गट: अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील), भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)
इतर मागासवर्गीय गट : शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)
अनुसूचित जाती गट: राजू बाबा आवळे (सतेज पाटील)
भटक्या- विमुक्त जमाती गट: बयाजी शेळके (सतेज पाटील), अमर पाटील



Comments