top of page

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला फोनवरुन दमदाटी, शिंदेविरोधातही आक्षेपार्ह भाषा; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

6 hours ago
2 min read

बीड: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलू नये, अन्यथा तुमचे स्वागत बीडमध्ये कसे करायचे? हे ठरवू असा इशारा देत बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विरोध दर्शवला होता.


एकेकाळी मराठा आरक्षण आंदोलन चळवळीत जिल्हास्तरावर सक्रिय असलेले स्वप्नील गलधर यांनी थेट जरांगे पाटील यांना विरोध केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्याचबरोबर स्वप्नील गलधर यांचे होर्डींग जाळण्याचा प्रकारही समोर आला होता. यानंतर एकनाथ शिंदे व स्वप्नील गलधर यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरत दमदाटी केल्याची वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अखेर याप्रकरणी आता ईश्वर शिंदे या तरुणाविरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुन मनोज जरांगे पाटील समर्थक असल्याचे बोलले जात आहे.


शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यंत हिन व आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील ईश्वर शिंदे याच्याविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून शिवसेनेच बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांना फोन करून दमदाटी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आले.


पोलिसात दाखल फिर्यादीनुसार 13 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4:26 वाजताच्या सुमारास ईश्वर शिंदे याने शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांना फोन केला होता. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरून आणि पक्षाच्या भूमिकांवरून त्याने स्वप्नील गलधर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही जरांगे पाटील यांच्या विरोधात का भूमिका घेतली? असा जाब त्याने विचारला.


यावर मी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने मला पक्षाची भूमिका मांडावीच लागेल आणि जरांगे पाील यांनी आमच्या पक्षप्रमुखांवर बोलू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली, यावर ईश्वर शिंदे याने थेट एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत अर्वाच्य गलीच्छ आणि आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली. हे संपूर्ण फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून सोशल मिडियावर व्हायरल झाले.


या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या अंबाजोगाई तालुकाप्रमुख आर्जुन गोविंदराव वाघमारे यांनी 16 ऑक्टोबर 2026 रोजी पोलिस ठाणे गाठून फिर्यादी दिली. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 अंतर्गत अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात एनसीआर नोंदवण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरक्षक घुले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Comments


bottom of page