महाराष्ट्र सरकारचा निर्णय: सरकावरी कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी

मुंबई : महाराष्ट्रात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे आवाहन केले आहे. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी पुढाकर घ्यावा, असे निर्देश शासन परिपत्रकातून देण्यात आले आहेत. या निधीचा उपयोग राज्य सरकारकडून सुरू असलेल्या मदतकार्यासाठी केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरपकारी कमृचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न विविध विभागांतील अधिकारी-कमृचार्यांनी या मतदकार्यासाठी एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात संबंधित संघटनांनी 30 सप्टेंबर 2026 आणि 14 ऑक्टोबर 2026 रोजी शासनाला पत्रे पाठवली होती. त्यांनतर राज्यातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचार्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आहवान करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, ऑक्टोबर 2026 च्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम कपात करून ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम माजताना मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम विचारात घेतलीर जाणार आहे.
दरम्यान, संबंधित कार्यालयप्रमुख आणि विभागप्रमुखांनी कर्मचार्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी, तसेच जमा झालेल्या रकमेची कर्मचारीनिहाय नोंद ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कपात केलेल्या निधीचा हिशोब आणि देणगीदारांची माहितीही नियमानुसार सादर करावी लागणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झालेल्या रकमेची नोंद, पावत्या आणि देणगीदारांची माहिती नियमानुसार पाठवण्याची जबाबदारी संबंधित विभागांवरप असेल. आयकर सवलतीसाठी आवश्यक माहिती 25 नोव्हेंबर 2026 पूर्वी सादर करण्याचे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.



Comments