top of page

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटी पंकजा मुंडेंनी घेतलं दत्तक!

7 hours ago
1 min read

जालना : राज्यातील मराठा आरक्षण लढ्याचे केंद्र बींदू ठरलेले आणि देश पातळीवर गाजलेले जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गांव जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.


विशेष म्हणजे याच अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणाच्या आंदोलना नंतर राज्यभरात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष भडकला होता. यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावांवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टिका करण्यात आली होती. परंतु नजीकच्या काळात मनोज जरांगे पाटील यांची मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दलची भूमिका मवाळ झाली. दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे समर्थपणे पुढे नेत आहेत. गोरगरीब वंजारी समाजाला न्याय देऊ शकतात ओबीसींना न्याय देऊ शकतात, असे कौतुक जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. धनंजय मुंडे यांना टोकाचा विरोध तर पंकजा मुंडे यांना पाठिंबा असे काही विषय चित्र सध्या निर्माण झाले आहे.


मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटी गावात पायही न ठेवणार्‍या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आता थेट दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर हे गावच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी त्यांनी या संदर्भात घोषणा केली दुष्काळी परिस्थितीत गाव दत्तक अभियान अंतर्गत आपण जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गाव सर्वांगिण विकासासाठी दत्तक घेत असून आचारसंहितेनंतर पुढील महिन्यात त्या गावात भेट देणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी बैठकीत सांगितले.


मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि चळवळीचे केंद्र राहिलेल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेत पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये निर्माण झालेला दुरावा काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Comments


bottom of page